कराड : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील पाचवड फाटा येथे उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीने पाठीमागून धडक दिली. या अपघातात उंब्रज येथील दोन युवक ठार झाले. सोमवारी (दि. 12) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ट्रॅक्टर ट्रॉलीला रिफ्लेक्टर नसल्यामुळे हा अपघात झाला असल्याची चर्चा अपघातस्थळी सुरू होती.
अमर तुकाराम शेळके (वय 30, रा. तारळे, सध्या रा. उंब्रज, ता. कराड) व गणेश दिलीप आटोळे (21, रा. उंब्रज, ता. कराड) अशी अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत. दोघेही आचारी काम करीत असल्याचे समजते. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, अमर शेळके व गणेश आटोळे हे दोघेजण मोटरसायकलवरुन कराड बाजूकडून कोल्हापूर बाजुकडे निघाले होते. महामार्गावरुन जात असताना पाचवड फाटा येथे पुढे निघालेल्या ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला त्यांच्या दुचाकीची धडक बसली. ट्रॅक्टर ट्रॉलीला रिफ्लेक्टर नसल्यामुळे त्यांना ती दिसली नसावी, अशी चर्चा घटनास्थळी सुरु होती.
अपघात एवढा जबरदस्त होता की, दुचाकीवरील दोघेही युवक जागीच ठार झाले. तर दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. धडक झाल्यानंतर एक युवक रस्त्यावर बाजूला फेकला गेला तर दुसरा दुचाकीवरच पडला होता. दोघांच्याही अंगावरती ऊसाने मार लागल्याच्या खुणा दिसत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तसेच त्यांच्या नाकातोंडातून रक्त येत होते. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पेट्रोलिंगचे राजू खैरे व श्रीधर खैरे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघात झालेल्या युवकांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. तसेच तालुका पोलिस ठाण्याचे हवालदार विजय भोईटे व संदीप घोरपडे यांनीही घटनास्थळी धाव घेऊन अपघाताचा पंचनामा केला.
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |

गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |