05:41pm | May 24, 2018 |
सातारा : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विधानपरिषद आमदार निरंजन डावखरे यांनी काल राष्ट्रवादीला रामराम करीत आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती. राष्ट्रवादीचा एक शिलेदार भाजपात डेरेदाखल होत असतानाच दिवंगत माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांचे सुपूत्र व सातारा जिल्ह्यातील नरेंद्र पाटीलही भाजपच्या वाटेवर असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
माथाडी कामगार संघटनेचे संस्थापक दिवंगत अण्णासाहेब पाटील यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात आहे. मुंबई व नवी मुंबईतील माथाडी कामगारांचे नेतृत्व त्यांनी काही दशके केले होते. अण्णासाहेब पाटील यांना माथाडी कामगारांनी देवत्वाचा दर्जा दिलेला आहे. सातारा, पुणे, कोकण या भागातील मोठ्या प्रमाणावर नागरिक माथाडी म्हणून मुंबईत काम करीत असतात. मस्जिद बंदर, नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, कळंबोली येथील लोखंड मार्केट याठिकाणी हजारोंच्या संख्येने माथाडी कामगार कार्यरत आहेत. नवी मुंबईतील राजकारण नेहमी माथाडींच्या मतांच्या टक्क्यावर फिरते. त्यामुळे सातारा असो किंवा नवी मुंबई, माथाडी कामगारांचे मतदान हे निर्णायक मानले जाते. माजी जलसंपदा मंत्री तथा कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार शशिकांत शिंदे यांचा उदयही माथाडी कामगार नेता म्हणूनच झाला आहे. गेली दीड दशके शशिकांत शिंदे सातारा व राज्याच्या राजकारणात आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देवून त्यांचा सन्मान केला होता. त्यामुळे माथाडी कामगारांची ताकद यावरुन लक्षात येवू शकते. मात्र, ज्या माथाडी कामगारांसाठी दिवंगत अण्णासाहेब पाटील यांनी आपले आयुष्य खर्ची घातले, त्या अण्णासाहेबांसाठी आपण काहीच करु शकलो नाही, अशी खंत राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवारांच्या मनात घर करुन होती. शेवटी माथाडी कामगारांच्या रेट्यामुळे सुमारे पाच वर्षापूर्वी शरद पवार यांनी आ. नरेंद्र पाटील यांची विधानपरिषदेवर वर्णी लावून माथाडी कामगारांचा खर्या अर्थाने सन्मान केला होता. यानंतर आ. नरेंद्र पाटील यांनी विधानसभेमध्ये माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आवाज उठवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. आ. नरेंद्र पाटील म्हणजे अजातशत्रू व्यक्तिमत्व. राष्ट्रवादी बरोबर भाजपा, शिवसेना, कॉंग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांबद्दल आ. नरेंद्र पाटील यांचे घनिष्ट राजकीय संबंध आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर माथाडी कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले होते. यासाठी अनेकदा नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माथाडी कामगारांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर आणून प्रश्न सोडविण्याचे काम केले होते. हजारो माथाडी कामगारांची ताकद नरेंद्र पाटील यांच्या पाठीशी असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आ. पाटील यांच्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून होते. देवेंद्र फडणवीस व आ. पाटील यांच्यातील वाढलेल्या सलगीमुळे अनेकजण आ. पाटील भाजपात जाणार, अशी अटकळ बांधून होते. मात्र, नरेंद्र पाटलांनी वारंवार अशा अटकळी धुडकावून लावल्या होत्या. काल विधानपरिषदेचे राष्ट्रवादीचे सदस्य आ. निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादीवर सोडचिठ्ठी अस्त्र डागून राष्ट्रवादी अंतर्गत राजकारणाला वैतागून भाजपात जाण्याचा मार्ग स्विकारला. त्याच मार्गावर सध्या आ. नरेंद्र पाटील हेही आहेत. डावखरेंसारखीच नरेंद्र पाटलांची गळचेपी झालेली आहे. त्यामुळे माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आ. पाटील राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपचे कमळ हाती घेणार आहेत, अशी खात्रीलायक माहिती सातारा टुडे कडे आली आहे. लवकरच आ. नरेंद्र पाटीलही डावखरेंसारखे भाजपवासी झाल्यास आश्चर्य वाटावयास नको.
नरेंद्र पाटील हे जिल्ह्याचे सुपूत्र असल्यामुळे त्यांच्याबद्दल पाटण भागातील जनतेमध्ये आस्था आहे. मात्र, नरेंद्र पाटील राष्ट्रवादीमध्ये राहणार की जाणार, हे मात्र येणार्या काळातच समजणार आहे.
मी शेवटपर्यत राष्ट्रवादीतच : आ. नरेंद्र पाटील
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला विधानपरिषदेचा आमदार केले. राष्ट्रवादीपासूनच मी माझ्या राजकीय करिअरची सुरुवात केली. त्यामुळे राष्ट्रवादी सोडण्याबाबत मी विचार केलेला नाही. मुख्यमंत्र्यांचे व माझे वैयक्तिक चांगले संबंध आहेत. आमदारकीच्या पहिल्या दिवसापासून निरंजन डावखरे व मी विधान परिषदेच्या एकाच बेंचवर बसत आलेलो आहे. त्यामुळे त्यापासून कोणीही वेगळा अर्थ घेवू नये. निरंजन डावखरेंच्या भविष्यातील वाटचालीस माझ्या शुभेच्छा आहेत, असे सातारा टुडे शी बोलताना आ. नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |