RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

विधानपरिषदेचे सभापती नेमके कोणाचे ?

18 June 2019 at 22:40

मंत्री चंद्रकांतदादा पाटलांनी रामराजे नाईक-निंबाळकरांना फटकारले

मुंबई : राज्याच्या सर्वोच्च सभागृहाचे सभापती खरे तर सर्व पक्षांचे हवे पण ते एका पक्षाचे असल्यासारखे वागत आहेत,'' त्यामुळे विधानपरिषदेचेसभापती नेमके कोणाचे? हा प्रश्‍न आता उपस्थित झाला आहे. अशी टीका महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावर केली. 

महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "दालनात फेटाळलेला निर्णय परत घ्यायचा नसतो. गटनेत्यांच्या बैठकीत असे ठरले होते की आधी प्रश्‍नोत्तरे महत्त्वाची असल्याने ती घ्यायची. त्याशिवाय स्थगन प्रस्ताव मांडायला परवानगी द्यायची नाही पण या सभापतींनी धनंजय मुंडे यांना बोलण्याची विशेष परवानगी दिली. अर्थसंकल्प सुरू असताना मंत्र्यांना थांबविण्याचा प्रकार आतापर्यंत कधी घडला नव्हता. सभापतींनी सभागृह स्थगित केले हे योग्य नाही. ते संपूर्ण सभागृहाचे सभापती असल्यासारखे वाटत नव्हते तर ते आज एका पक्षाचे नेते असल्यासारखे वागत होते.'' राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पहिल्यांदाच विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावर तोफ डागली आहे. सध्या सातारा जिल्ह्यात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सोडचिट्टी देवून शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. अश्या वावड्या उठल्या असतानाच राज्याच्या मंत्रीमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे समजले जाणारे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावर आज तोफ डागल्यामुळे रामराजेंच्या शिवसेना प्रवेशावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मलाताई यांचे निधन

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मलाताई पुरंदरे यांचे (वय-८६) आज (शनिवारी) प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

21 July 2019 at 02:45

ट्रक-कारच्या भीषण अपघातात ९ ठार

लोनी काळभोर वाक वस्ती येथे पुणे-सोलापूर मार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात कारमधील ९ महाविद्यालयीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कारमधील प्रवासी हे यवत येथील रहिवासी होते.

20 July 2019 at 15:44

मुंबईतील डोंगरीमध्ये इमारतीचा अर्धा भाग कोसळला, 12 जणांचा मृत्यू

मुंबईतील डोंगरी भागातील कौसर बाग नावाच्या चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत 40 ते 45 लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून एनडीआरएफच्या पथकालाही पाचारण करण्यात आलं आहे.

16 July 2019 at 16:49

दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांचे निधन

दलित पँथर चे संस्थापक, आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, ज्येष्ठ विचारवंत नेते राजा ढाले यांचे निधन झाले. आज, मंगळवार (दि १६) सकाळी विक्रोळी येथील निवासस्थानी त्याची प्राणज्योत मालवली. राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर दुःखाचा डोंगर कोसळला.

16 July 2019 at 14:25