कोपर्डे हवेली : ऐन दिवाळीत टाळगाव व साळशिरंबे येथे झालेल्या जबरी चोरींच्या घटना ताज्या असतानाच कराड तालुक्यातील कोपर्डे हवेली येथे चोरट्यांनी दोन घरे फोडून 14 तोळे दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली. यावेळी चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दागिनेही जबरदस्तीने हिसकावून नेले. दरम्यान, शिवाजी किसन साळवे यांच्या घराजवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यात चार चोरटे कैद झाले आहेत. शनिवारी (दि. 10) रात्री ही घटना घडली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास चोरट्यांनी कोपर्डे हवेलीतील मुख्य रस्त्याच्याकडेला असलेल्या संगीता सुनील रसाळ यांच्या घरात घुसून त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची चेन हिसकावून तेथून पळ काढला. यावेळी गळ्यातील चेन ओढत असतानाच संगीता रसाळ जाग्या झाल्या; परंतु डोळ्यांवर बॅटरीची लाईट मारल्याने त्यांना समोरचे काहीच लक्षात आले नाही. तशाही परिस्थितीत संगीता रसाळ यांनी चैन ओढून धरली होती. मात्र जोराचा हिसका दिल्याने चैन त्यांच्या हातून निसटली. त्यामुळे त्यांनी लगेच चोरट्यांच्या हातात असलेली शिग ( रॉड ) पकडला आणि चैन परत मागितली. परंतु, चोरट्यांनी शिग सोड नाहीतर आमच्याकडे चाकु आहे, असे म्हणत चाकूचा धाक दाखवला. त्यामुळे संगीत रसाळ यांनी शिग सोडून दिली.
तदनंतर चोरट्यांनी आपला मोर्चा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रानजिक असलेल्या शिवाजी किसन साळवे यांच्या घराकडे वळविला. साळवे यांच्या दाराची कडी काढून त्यांनी घरात प्रवेश केला. घरातील सर्व जण झोपेत असताना आतल्या खोलीत असलेल्या कपाटाचे दार उघडून कपाटातील सुमारे बारा तोळ्याचे सुवर्ण अलंकार आणि दोन हजार रुपये रोख रक्कम चोरून तेथून पोबारा केला. यावेळी चोरट्यांनी कपाटातील साहित्य विस्कटून घराबाहेर टाकले होते. दरम्यान, घराबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यात चोरटे कैद झाले आहेत. त्याचा आधार घेऊन पोलिस चोरट्यांचा तपास करत आहेत.
चोरीची माहिती मिळताच डीवायएसपी नवनाथ ढवळे व पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या अनुषंगाने पोलीस कर्मचार्यांना सुचना केल्या. पो.नि. अशोक क्षीरसागर तर रात्रभर घटनास्थळी थांबून होते. तसेच चोरीच्या तपासासाठी श्वान पथक व ठसे तज्ञाना पाचारण करण्यात आले आहे. परंतु, श्वान पथकाने शिवाजी साळवे यांच्या घरापर्यंतच माग काढला.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |