सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सातारा शहरालगत वाढे फाटा येथे 1 किलो वजनाचे सुमारे 4 लाख रुपये किंमतीचे मांडूळ सातारा शहर पोलिसांनी जप्त केले असून याप्रकरणी एका युवकाला अटक तर त्याच्या अल्पवयीन मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून या पाठीमागे मोठी साखळी असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कुणाल सतीश कोळी (वय 18, रा.खंडोबा माळ, सातारा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून त्याच्या 16 वर्षीय अल्पवयीन मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी रात्री वाढे फाटा येथे मांडूळ विक्रीसाठी दोन युवक येणार असल्याची माहिती शहर पोलिसांना समजली.
माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला असता रात्री उशीरा दोन युवक एका दुचाकीवर संशयितरीत्या फिरत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी संशयितांना हटकले असता ते दोघे गडबडले व पळून जाण्याचा प्रयत्न करु लागले. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे पिशवी होती. पोलिसांनी पिशवी पाहिली असता त्यामध्ये मांडूळ असल्याचे समोर आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेवून प्राथमिक चौकशी केली असता त्यांनी नावे सांगितली. त्यातील एकजण अल्पवयीन होता.
पोलिसांनी मांडूळाची माहिती घेतली असता ते 1 किलो वजनाचे व सुमारे 3 फुट अंतराचे आहे. बाजारभावाप्रमाणे त्याची किंमती 3 लाख 80 हजार रुपये आहे. तसेच पोलिसांनी संशयितांची दुचाकी जप्त केली आहे. संशयितांवर वन्यप्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोनि नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अनिल स्वामी यांनी कारवाई केली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |