11:39pm | Nov 23, 2018 |
कराड : रेठरे बुद्रुक (ता.कराड) येथील यशवंतराव मोहीते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या तोडणी यंत्रणेत यावर्षी नवीन चार हार्वेस्टर मशिन दाखल झाले आहेत. यामुळे कारखान्याची तोडणी यंत्रणा गतिमान होणार आहे. या मशिनचे पूजन कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ.सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने शेतकरी सभासदांना अधिकाधिक सेवासुविधा पुरविण्यासाठी, ऊसतोड मजूरांच्या टंचाईवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला होेता. त्यानुसार कृष्णा बँकेच्या सहकार्यातून गतवर्षीपर्यंत कारखान्याच्या शेतकरी सभासदांनी एकत्रीत येवून सहा हार्वेस्टर मशिन घेतलेली आहेत. यात वाढ होवून यावर्षी तोडणी यंत्रणेत नवीन चार हार्वेस्टर मशिन दाखल झालेली आहेत. येत्या काही दिवसात आणखी नवीन तीन तोडणी मशीन कारखान्याच्या तोडणी यंत्रणेत दाखल होणार आहेत. या यंत्राच्या माध्यमातून शेतकरी सभासदांना व्यवसायाची नवीन संधी उपल्बध झाली आहे.
या मशिनचे पूजन व कृष्णा कृषि संघाने तयार केलेल्या नवीन अंगद बांधणीचे पूजन कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी व्हा.चेअरमन लिंबाजीराव पाटील, संचालक धोेेंडीराम जाधव, निवासराव थोरात, संजय पाटील, दिलीपराव पाटील, कार्यकारी संचालक सुर्यकांत दळवी, कृष्णा बँकेचे उपाध्यक्ष दामाजी मोरे, संजय गांधी निराधार योजनेचे कराड तालुकाध्यक्ष संजय पवार, बहेचे उपसरपंच मनोज पाटील, कृष्णा कृषि संघाचे चेअरमन शशिकांत पाटील, व्हा.चेअरमन संदीप यादव, मुख्य शेती अधिकारी प्रकाश सुर्यवंशी, कृष्णा बँकेचे शाखाधिकारी डी.डी पाटील, दादासो सोमदे, धनाजी देसाई, अमरसिंह जाधव, महादेव जगताप, अनिल जगताप, अमृत शिंदे, सचिन देसाई, नितीन पाटील, जयवंत पाटील, संभाजी पवार, सुरेश साळुंखे, अनिल पवार आदीसह शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |