04:50pm | Mar 15, 2018 |
सातारा : ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ ही बिरुदावली मिरवणार्या पोलिसांच्या कामगिरीवर काळीमा फासणारी घटना सातारारोड आऊटपोस्ट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून दहावीत शिकणार्या अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची तक्रार देणार्या पालक व त्यांच्या नातेवाईकांच्या मागे आरोपी व पोलिसांचा ससेमिरा लागला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी दखल घेतली, पण स्थानिक पोलिसांनी ही घटना बेदखल केल्यामुळे पालक भयभीत झाले असून भितीपोटी त्यांनी आता सातारारोड येथील राहते घर सोडून सातारा शहरात वास्तव्य केले आहे. या धक्कादायक प्रकारामुळे महिला संघटनेमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
याबाबत दहावीत शिकणार्या या अल्पवयीन युवतीने सांगितले की, सुमारे सहा महिन्यापूर्वी आयसीटी परिक्षेच्या पूर्व तयारीसाठी मी अभ्यासाच्या नोट्स आणण्यासाठी तिच्या सहअध्यायीकडे वही आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी सकाळचे अकरा वाजले होते. रविवार असल्यामुळे परिसरात बर्यापैकी रहदारी होती. तिची सहअध्यायी घरी नसल्यामुळे ती आपल्या घरी निघाली असता. तिच्या सहअध्यायीच्या घराशेजारी राहणार्या आरोपीने तिला माझी मम्मी तुला बोलावत आहे, असे सांगितल्यामुळे ती युवती त्याच्या दारापर्यंत गेली. त्यानंतर घरात डोकावले असता त्याने सांगितले की, मम्मी आतल्या खोलीत आहे. त्यामुळे मी आत गेले असता संबंधित आरोपीने आतील दरवाजा लावून घेतला. मी या अनपेक्षित प्रकारामुळे रडायला लागल्यामुळे त्याने घाबरुन दरवाजा उघडला. मी ही बाब माझ्या आई-वडील परगावी गेल्यामुळे माझा भाऊ व काकींना गोष्ट कानावर घातली. त्यांनी ही बाब युवतीच्या आई-वडिलांना सांगितली. त्यामुळे एवढा मोठा गंभीर प्रकार घडल्यामुळे आई-वडील तातडीने साताररोडला आपल्या घरी आले.
या घटनेनंतर जाब विचारण्यासाठी आरोपीच्या घरी गेले असता, संबंधित आरोपी हा पळून गेल्याचे समजले. त्यामुळे आम्ही सातारारोड आऊटपोस्टला रितसर तक्रार देण्यासाठी गेलो. त्याठिकाणी तीन पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत होते. या पोलीस कर्मचार्यांना आपल्यावर गुदरलेला प्रसंग सांगितला. परंतू घडलेल्या घटनेऐवजी त्यांना सोयिस्कर होईल अशा पद्धतीने त्यांनी गुन्हा नोंदवून घेतला, हे आम्हाला एफआयआर वाचल्यानंतर कळाले. आमच्या हातात एफआयआर आल्यानंतर संबंधित युवतीबाबत घडलेला खरा प्रसंग या एफआयआरमध्ये नसल्याचे त्यांना सांगूनही त्यांनी या एफआयआरवर मुलीच्या आईची सही घेतली. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. त्यामुळे आम्हाला न्याय मिळाला, या भ्रमात आम्ही आश्वस्त झालो होतो. त्यानंतर आरोपीला जामीन मिळाल्यानंतर आरोपीच्या आईने तक्रारदार महिला मागासवर्गीय समाजाची असून आरोपी हा उच्चवर्णीय आहे. मागासवर्गीय तक्रारदार महिलेचा सूड घेण्यासाठी युवतीचे वडील व त्यांच्या नातेवाईकांवर मारहाणीची खोटी फिर्याद आरोपीच्या आईने कोरेगाव पोलीस ठाण्यात दिली. हा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस हवालदार एस. एस. बसवंत यांनी चांगलाच पुढाकार घेतला होता. तसेच हे मुलीचे प्रकरण मिटविण्यासाठी काही मध्यस्थींनीही प्रयत्न केले. तसेच पैशाची लालुचही दाखविण्यात आली. परंतू आम्ही मागासवर्गीय असलो तरी आमचा इज्जतीचा लिलाव केलेला नाही. इतर जातीला जशी इज्जत असते, तशी आम्हालाही आहे, असे या मध्यस्थींना ठणकावून सांगितल्याची माहिती पीडित मुलीच्या आईने दिली.
सध्या हा प्रकार मिटविण्यासाठी मुलगी व तिच्या पालकांवर मानसिक दबाव टाकला जात आहे. संबंधित आरोपी हा धनदांडगा असून त्याने एका मागासवर्गीयाचा वापर करुन माझे पती यांच्याविरोधात पैसे देवून वैद्यकीय प्रमाणपत्र करुन घेतले व त्याचा वापर करुन आमच्याविरोधात मारहाणीचा खोटा गुन्हा दाखल केला आणि आमच्यावर मात्र खरी पोलीस कारवाई करण्यात आली. सध्या आरोपी आणि पोलीस हे आमच्या जिवावर उठल्यामुळे आम्ही भयभीत झालो आहोत. आमच्या पाठिशी कोणीही नाही. आम्हाला जर न्याय मिळाला नाही, तर आम्ही सर्वजण मुंबईतील मंत्रालयात जावून आत्महत्त्या करु, अशीच आमच्यावर वेळ आली आहे, असे त्यांनी खेदाने नमूद केले आहे. तसेच न्यायासाठी राष्ट्रीय चर्मकार संघाचे संस्थापक- अध्यक्ष व चर्मकार ऐक्य परिषदेचे अध्यक्ष बाबुराव माने यांच्याशी संपर्क साधला आहे. याच नव्हेतर कोणत्याही माता-भगिनीवर अन्याय झाल्यास आम्ही आक्रमकपणाने रस्त्यावर उतरु तसेच साताररोडला जावून या घटनेबाबत आंदोलनाची दिशा ठरवू, असे माने यांनी सांगितले. या घटनेमुळे समस्त महिला संघटना आक्रमक झाल्या असून महिलादिनी शुभेच्छा देणार्यांनी आता खर्या अर्थाने न्यायासाठी पाठिंबा द्यावा, अशीही विनंती पिडीत मुलीने व तिच्या आईने केली आहे.
सातारा टूडे मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
www.bit.ly/SataraToday
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |