03:10am | Jul 12, 2019 |
सातारा : जवळवाडी, ता. जावली नजीक दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात विवाहितेच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या अधिकारी व ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. त्या विवाहितेच्या कुटुंबीयास आर्थिक नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा शिवसेनेच्यावतीने अपघातांना जबाबदार ठरलेल्या ठेकेदार व अधिकाऱ्यांविरुद्ध लोकशाही मार्गाने जन आंदोलन करेल, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी सातारा जिल्हा प्रशासनाला एका निवेदनाद्वारे दिला.
निवेदनात म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यामध्ये अनेक रस्त्यांची दुरुस्तीची व रुंदीकरणाची कामे सुरू आहेत. सर्वत्र रस्ते खोदाई करून अथवा भरावा करून भर पावसात कामे सुरू आहेत. कामे करत असताना केलेल्या खुदाईमुळे अथवा भरावा खचल्यामुळे रस्त्यांमध्ये मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. वाहनचालकांना त्या खड्डया चा वारंवार सामना करावा लागत आहे. खड्डयात वाहने आदळून अपघातांच्या घटनेत वाढ होऊ लागली आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे वेळीस भरून घेण्याचे काम ठेकेदारांकडून होत नसल्यामुळे सोमवारी मेढानजीक जवळवाडी गावच्या हद्दीत दुचाकी पाण्याने भरलेल्या खड्डयात आपटून दुचाकीवरून तोल जाऊन रस्त्यावर पडल्याने पाठीमागून येणाऱ्या ट्रकखाली चिरडून भाग्यश्री गणेश जाधव या विवाहितेचा मृत्यू झाला आहे. अशाच प्रकारचे असंख्य अपघात जिल्ह्यात घडत आहेत.
या अपघाताच्या घटनांना संबंधित रस्त्यांचे ठेकेदार, त्यांचे व्यवस्थापन आणि बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत. यांच्या निष्काळजीपणामुळेच अपघातात अनेक जणांचा मृत्यू होत आहे. अशा ठेकेदार व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून जवळवाडी येथील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विवाहितेच्या कुटुंबीयांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी. तसे न झाल्यास शिवसेना ठेकेदार व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले असा इशारा देण्यात आला आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |