06:47pm | Mar 09, 2018 |
सातारा : सातारा जिल्ह्यात धरणग्रस्तांच्या प्रश्नानंतर आता अभयारण्यग्रस्तांनासुद्धा न्यायासाठी आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. जावली तालुक्यातील देऊर येथील अभयारण्यग्रस्तांनी ठोसेघर, रायगड त्यानंतर वाई तालुक्यातील बोपेगाव येथील वनविभागाची जमीन पसंत केली आहे. परंतू अद्यापही सतरा वर्षे उलटून गेली तरी पुनर्वसनाचा प्रश्न सुटलेला नाही. आता बोपेगावकरांनी मनाचा मोठेपणा दाखवून 28 अभयारण्यग्रस्तांना पुनर्वसनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन देऊर ग्रामस्थांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या येथील उपोषणस्थळी केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, देऊर, ता. जावली येथील ग्रामस्थांची वडिलोपार्जित जमीन वनविभागाने 17 वर्षापूर्वी ताब्यात घेतली. त्यावेळी तुमचे पुनर्वसन करु, असा शब्द देण्यात आला. त्याप्रमाणे वनविभागाच्या अधिकार्यांनी रायगड जिल्ह्यातील पळस्पे, नेरे, एकसळ अशा अनेक ठिकाणी ग्रामस्थांना जमीन दाखवली. ती जमीन पुनर्वसनासाठी योग्य असल्याचे ग्रामस्थांनी लेखी स्वरुपात लिहून दिले. परंतू क्षेत्रीय वनसंरक्षक व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर, कराड उपसंचालक व प्रादेशिक अधिकारी यांनी रायगड जिल्ह्यात पुनर्वसनासाठी जमीन देता येत नाही, असे ग्रामस्थांना सांगितल्यामुळे ग्रामस्थांच्या पायाखालची वाळूच सरकून गेली. त्यानंतर ग्रामस्थांनी पुनर्वसनासाठी पाठपुरावा केला. त्यावेळी बोपेगाव येथील वनविभागाची जमीन कंपार्टमेंट नं. 41, 42, 43 मधील जमीन पुनर्वसनासाठी योग्य असल्याचे सांगून अभयारण्यग्रस्तांच्या आशा पल्लवित ठेवल्या. आज उद्या पुनर्वसन होईल, या आशेने ग्रामस्थ खूष झाले असतानाच बोपेगाव ग्रामसभेत ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याची कारणे सांगून अभयारण्यग्रस्तांना झुलवत ठेवण्यात आले. त्यामुळे दि. 5 मार्च 2018 पासून ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले. त्यानंतर 8 मार्च रोजी क्षेत्रीय वनसंरक्षक व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या संचालिका यांनी चाळकेवाडी पठारावर असणार्या वनकुटीमध्ये ग्रामस्थांची बैठक बोलावली. परंतू अद्यापही पुनर्वसनाबाबत तोडगा निघालेला नाही. आम्ही देऊरचे ग्रामस्थ असून बोपेगावचे सुपूत्र माजी खा. लक्ष्मणराव पाटील, वाईचे विद्यमान आमदार मकरंद पाटील यांच्या गावात पुनर्वसन झाल्यास आम्हाला कोणत्याही नागरी सुविधांपासून वंचित रहावे लागणार नाही, अशी आम्हाला खात्री वाटत आहे.
आमच्या अनेक पिढ्या दुर्गम भागात वास्तव्यास होत्या. आता आम्हाला महामार्गाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे बोपेगावकरांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, असे आवाहन देऊरचे शिवाजी माने, अंकुश चाळके, विशाल माने, बाळकृष्ण आखाडे, सखुबाई जानकर, यशोदा कोकरे, लक्ष्मीबाई माने या उपोषणकर्त्यांनी केले आहे. त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडविला तर आम्ही उपोषण मागे घेण्यास तयार आहे, असेही शिवाजी माने यांनी पत्रकारांना सांगितले. तसेच जिल्हाधिकार्यांच्या विनंतीला मान देऊन उपोषणाची सांगता करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. परंतू वनविभागाने आमचा प्रश्न लवकर सोडवला नाही तर सातारा येथील वनविभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करुन शासनाचा निषेध करण्यात येईल, असेही उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |