RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

कोरेगावातून वेदांतिकाराजे, तर वाई-खंडाळ्यातून शिवांजलीराजे?

09 October 2018 at 15:01

सोशल मिडियावरील मॅसेजमुळे नेटकर्‍यांचे मनोरंजन

सातारा : सोशल मिडियाच्या जमान्यात कोण काय करेल, याचा नेम नाही. सुपातच नाही, तर जात्यात कोठून येणार? असा प्रश्‍न राज्यभरात राष्ट्रवादीचा असताना सातार्‍यात मात्र तेल लावलेले अनेक पैलवान शड्डू ठोकून लोकसभेच्या आणि विधानसभेच्या रिंगणात उतरलेले आहेत. दोन दिवसांपासून असाच एक मॅसेज व्हॉटसऍपवर व्हायरल झाला आहे. कोरेगाव विधानसभेसाठी सौ. वेदांतिकाराजे भोसले, तर वाई-खंडाळ्यातून शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह सुमारे डझनभर नावे सोशल मिडियावर अक्षरश: धुमाकूळ घालीत आहेत. त्यामुळे अनेकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

गेल्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये मोदी लाटेसमोर देशात आणि राज्यात कॉंग्रेससह राष्ट्रवादीचे पानिपत झाले होते. 14 वर्षांपासून हातात हात घालून राज्यात आणि केंद्रातील सत्तेची चव चाखणार्‍या कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सपाटून मार खावा लागला होता. असे असतानाही सातारा जिल्ह्याने राष्ट्रवादीची आब्रु वाचविण्याचे काम केले होते. सातारा व माढा हे दोन लोकसभा मतदारसंघ जिंकण्याची किमया राष्ट्रवादीने केली होती. मात्र, असे असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची पिछेहाट झाली होती. त्यामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणार्‍या सातारा जिल्ह्यामध्ये भाजपसह शिवसेनेने चढाई करुन बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याचे काम केले आहे. सध्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांचे मतलबी वारे जिल्हाभरात घोंगावू लागले आहेत. लोकसभेसाठी मीच, विधानसभेसाठीही मीच, अशाही चाचपण्या सुरु आहेत. सध्या सातारा लोकसभा मतदारसंघावरुन दावे-प्रतिदावे सुरु झाल्यामुळे विद्यमान खासदार उदयनराजे एका बाजूला, तर जिल्ह्यातील संपूर्ण राष्ट्रवादी एका बाजूला असे चित्र निर्माण झाले आहे. असे असतानाच दोन दिवसांपासून राष्ट्रवादी प्रायव्हेट लिमिटेड मॅसेज व्हॉटसऍपवर व्हायरल झाला आहे. या मॅसेजमध्ये सातारा-जावली विधानसभा मतदारसंघातून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, वाई-खंडाळा-महाबळेश्‍वरमधून शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर, कोरेगावमधून सौ. वेदांतिकाराजे भोसले, माण-खटावमधून संजीवराजे नाईक-निंबाळकर, कराड उत्तरमधून अनिकेतराजे नाईक-निंबाळकर, कराड दक्षिणमधून रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, पाटणमधून सत्यजितसिंह पाटणकर. सातारा लोकसभेसाठी छ. उदयनराजे भोसले, तर माढा लोकसभा मतदारसंघातून सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर या इच्छुकांची नावे व्हायरल होवू लागल्यामुळे सोशल मिडियावर नेटकर्‍यांचे यानिमित्ताने मनोरंजन होवू लागले आहे. 

त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील लोकसभा-विधानसभा मतदारसंघात पवार परिवारातील सुमारे डझनभर व्यक्तींची नावे जोडली गेल्यामुळे पुणे जिल्ह्यातही खळबळ उडाली आहे. लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ज्या खोडसाळपणाने हा मॅसेज ज्याने व्हायरल केला, त्या मॅसेजमुळे मात्र सतरंज्या उचलणार्‍या इच्छुक कार्यकर्त्यांची मात्र पाचावर धारण बसली आहे. अनेकांनी हा मॅसेज गंमत म्हणून फॉरवर्ड केला. मात्र या गंमती-जंमतींमुळे अनेकांचे ‘बीपी हाय’ झाले आहेत.

रामदास माने उद्योग भूषण पुरस्काराने सन्मानित

लोधवडेचे सुपूत्र व पुणे येथील आंतरराष्ट्रीय उद्योजक रामदास मानसिंग माने यांनी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कोल्हापूर येथील समर्थ फांऊंडेशनच्या वतीने नुकताच कोल्हापूर येथे "उद्योग भूषण पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले आहे.

3 hours before

कास्ट्राईब संघटना राज्यभर आंदोलन छेडणार : अजित वाघमारे

विषयावर राज्यभर जनजागृती करुन सरकाराच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब संघटनेच्यावतीने देण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अजित वाघमारे यांनी दिली.

4 hours before

पतंग उडवताना विहिरीत पडल्याने मुलाचा बुडून मृत्यू

येथील राधिका रोडवर प्रतापसिंह शेतीफार्म नजीक असलेल्या विहरीत प्रतीक गुलाब मतकर (वय 16, रा.बुधवार) या युवकाचा रविवारी दुपारी पाण्यात बुडून मृत्यू झाला.

5 hours before

सालपे येथील वृद्धेच्या खुनाचा अखेर दीड महिन्यानंतर छडा

सालपे ता. फलटण येथे शांताबाई जयवंत खरात (वय 70) या वृध्द महिलेच्या खूनाला अखेर दीड महिन्यानंतर वाचा फुटली असून चोरीच्या उद्देशाने तो खून झाला असल्याचे समोर आला आहे.

5 hours before