सातारा : मोक्काअंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक करण्यासाठी शुक्रवारी रात्री प्रतापसिंहनगरात गेलेल्या पथकातील सातारा शहर पोलीस ठाण्याचे कर्मचार्यावर हल्ला करुन शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी लक्ष्मीबाई रामचंद्र जाधव (वय 65, रा.प्रतापसिंहनगर) यांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, लक्ष्मीबाई जाधव गुंड दत्ता जाधव याची आई आहे.
प्रतापसिंहनगरात राहणार्या दत्ता जाधव याच्याविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. मात्र मोक्का लागल्यापासून दत्ता जाधव हा पसार होता. सातारा पोलिस शोध घेत जत तालुक्यातील प्रतापपूर येथे पोहचल्यानंतर दत्ता जाधव तेथूनही नाट्यमयरीत्या पसार झाला होता. त्यावेळी त्याच्या साथीदारांनी सातारा, सांगली पोलिसांवर तुफान दगडफेक व पोलीस व्हॅनची तोडफोड केली होती. जत येथील घटनेने सातारा पोलिसांसमोर दत्ताला अटक करण्याचे आव्हान निर्माण झाले होते.
शुक्रवारी घटनेनंतर दत्ता जाधव याचे वास्तव्य प्रतापसिंहनगरात असल्याची माहिती सातारा पोलिसांना मिळाली होती. यानुसार त्याला पकडण्यासाठी शुक्रवारी पोलीस पोलीस प्रतापसिंहनगर येथे गेले होते. रात्री सातनंतर पोलिसांच्या पथकांच्या हालचालींना मोठ्या प्रमाणात वेग आला. घरातून बाहेर पडून दत्ता जाधव हा देवळाजवळ असणार्या पत्र्याच्या शेडमध्ये असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर साध्यावेशात असणार्या कर्मचार्यांची सगळी पथके त्या परिसरात एकत्रित करण्यात आली. पोलिसांच्या शोध मोहिमेवेळी दत्ता जाधव हा पत्र्याच्या शेडमध्ये लपल्याचे आढल्यानंतर त्याला पकडण्यात आले.
दत्ता जाधव याला पकडल्यानंतर त्याने पोलिस पथकात असणार्या अनिल स्वामी या पोलीस कर्मचार्यास धक्काबुक्की केली. पोलिसांनी दत्ता जाधवला पकडल्याचे समजल्यानंतर त्याठिकाणी लक्ष्मी जाधव, गंगूबाई (पुर्ण नाव नाही), रमेश खुडे, झुंबर (पुर्ण नाव नाही) व इतर काहीजण आले. जाधवसह इतरांनी पोलीस पथकात असणार्या स्वामी यांचा गळा दाबला तसेच त्यांना खाली पाडून मारहाण करणे सुरु केले. यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करत पोलिसांवर हल्ला करणार्यांना तेथून पिटाळून लावले.
याबाबतची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर फौजदार चेतन मछले हे तपास करत होते. सोमवारी त्यांनी या गुन्ह्याप्रकरणी दत्ता जाधव याची आई लक्ष्मीबाई जाधव यांना सकाळी अटक केली. जिल्हा न्यायालयात त्यांना हजर केले न्यायाधिशांनी जामीनावर मुक्तता केली.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |