RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

पत्रकार पांडुरंग पवार यांचे अपघाती निधन

13 May 2019 at 23:31

सातारा : सातारा-लोणंद मार्गावर जरंडेश्वर नाका परिसरात भिक्षेकरी गृहाजवळ झालेल्या भीषण अपघातात सातार्‍यातील उत्कृष्ट मॅरेथॉनपटू व  पत्रकार पांडुरंग नामेदव पवार (वय 43 मूळ रा.धावडशी ता. सातारा सध्या रा. गुरुवार पेठ, सातारा) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या दुर्घटनेत त्यांचे सहकारी गंभीर जखमी आहेत. पांडुरंग पवार यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. 

राजेंद्र दशरथ गायकवाड (वय 50, रा. दौलतनगर, सातारा) हे अपघातात गंभीर जखमी झाले असून याबाबतची फिर्याद सतीश महादेव सूर्यवंशी (वय 47, रा. दौलतनगर, सातारा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात  दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 12 रोजी रात्री राजेंद्र गायकवाड व पत्रकार पांडुरंग पवार हे दोघे दुचाकीवरून (क्र. एम एच 11 सीसी 9937) नागेवाडी येथून सातार्‍यात परत येत होते.  राजेंद्र गायकवाड हे स्वत: दुचाकी चालवत होते तर पांडुरंग पवार हे दुचाकीच्या पाठीमागे बसले होते. रात्री 11 वाजून 45 मि.च्या सुमारास   दुचाकी येथील पुरुष भिक्षेकरी गृहासमोर आल्यानंतर वॅगनर कारची (क्रमांक एम एच 03 बीएच 4104) दुचाकीला धडक बसली. याचदरम्यान  कारच्या पाठीमागे असणार्‍या इटिर्र्गा कारची (क्रमांक एम एच 11 व्हीव्ही 7193) वॅगनर कारला धडक बसली.

या भीषण अपघातामुळे दुचाकीवरील पांडुरंग पवार व राजेंद्र गायकवाड हे दोघे गंभीर जखमी झाले. त्याचदरम्यान त्या परिसरातून रुग्णवाहिका निघाली होती. अपघात पाहिल्यानंतर रुग्णवाहिकेवरील डॉ.दिपाली पाटील व चालक तानाजी पाटील (रा.मलकापूर, कराड) यांनी जखमींना रुग्णवाहिकेमधून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने पांडुरंग पवार यांना पुढील उपचारासाठी तत्काळ डॉ. अनिल पाटील यांच्या यशवंत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पत्रकार पांडुरंग पवार यांचा अपघात झाल्याचे समजताच सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, जीवनधर चव्हाण, शरद काटकर, विनोद कुलकर्णी, अविनाश कदम, अमोल मोहिते, राजू भोसले, प्रवीण पाटील, भालचंद्र निकम, संदीप शिंदे, दीपक दीक्षित, ओंकार कदम, विठ्ठल हेंद्रे, सचिन जाधव   व आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. पवार यांच्यावर उपचार सुरू असतानाच  सोमवारी सकाळी त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हे वृत्त समजताच पत्रकार क्षेत्रातील अनेकांनी रूग्णालयात धाव घेतली. 

आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेवून पवार यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. एक उमदा मित्र हरवल्याचे दु:ख आ. शिवेंद्रराजे यांनी व्यक्त केले. यावेळी जयेंद्र चव्हाण, राजेंद्र चोरगे, बापूसाहेब  जाधव, फिरोज पठाण, डॉ. संदीप काटे, डॉ. प्रताप गोळे, अमित महिपाल, रफीक फतरास व पत्रकारितेसह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी रुग्णालयात धाव घेतली.

दरम्यान, पोनि किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूपुरी पोलिसांनी अपघाताची दखल घेवून तपासाची चक्रे गतीमान केली. अपघातामध्ये दोन कारचा समावेश असल्याचे तपासात समोर आल्यानंतर अवघ्या काही तासात कार क्रमांक व चालकाची माहिती घेण्यात आली. वॅगनर कारवरील चालक मंगेेश मोहन पवार (रा.शिवथर ता.सातारा) याच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने कार चालवल्यामुळे अपघात झाल्याने चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्रकार पांडुरंग पवार यांच्या अपघाती एक्झिटमुळे सातारच्या पत्रकारिता क्षेत्रात  हळहळ व्यक्त होत आहे. 20 वर्षांपूर्वी धावडशी या आपल्या गावातूनच त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. विविध दैनिक, पोर्टेल या माध्यमातून  ग्रामीण भागातील समस्या मांडून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले. धडपडी व हरहुन्नरी असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून दिला. त्यामुळे त्यांना पत्रकारितेतील अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले होते. गेल्या सहा वर्षापासून त्यांनी मॅरेथॉन स्पर्धेत चुणूक दाखवली.  तेव्हापासून अखंडपणे त्यांनी सातारा, मुंबई, ठाणे, हैद्राबाद, नवी दिल्ली येथील मिनी मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होवून या स्पर्धा  गाजवल्या होत्या. अनेकांना त्यांनी मॅरेथॉनच्या मैदानात उतरवले. पांडुरंग पवार यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, भावजय असा परिवार आहे.

 

वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळे आरटीओ कार्यालयासमोरच वाहतुकीचे तीन तेरा

वाहनचालकांना वाहतुकीचे नियम शिकवणार्‍या उप प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) कार्यालयासमोरच रस्त्याच्या दुतर्फा होत असलेल्या बेकायदेशीर चारचाकी व दुचाकीच्या पार्किंगमुळे अजिंक्य हॉस्पिटल ते सैनिक स्कूल मार्गावर आरटीओ अधिकारी आणि एजंटांच्या संगनमताने

2 minutes before

जेसीबी पलटी होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

नलवडे (बिचुकले), ता. कोरेगाव येथील वाडगं तथा मोरदरा नावाच्या शेतशिवारातील जेसीबी पलटी होऊन झालेल्या अपघातात सामाजिक वनीकरण विभागाचा कंत्राटी कामगार जागीच ठार झाला.

2 hours before

फलटण येथील दत्त नगर येथे महिलेचा खून

दत्त नगर, चौधरवाडी ता. फलटण येथील हेमंत निंबाळकर यांच्या शेतातील घरात रहात असलेल्या महिलेचा अज्ञाताने खून केल्याची घटना घडली असून अरीफा रशीद शेख (वय ४८) असे मृत महिलेचे नाव आहे.

13 hours before

इथिओपियाचा फिक्रू अबेरा दादी प्रथम

ढगाळ वातावरण... यवतेश्वर घाटातील धबधबे ...रस्त्यावर आलेले ढग ... अशा आल्हाददायी वातावरणात आज सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात झाली. स्पर्धकांमुळे येवतेश्वर घाट फुलला होता. सातारकरांनी मार्गाच्या दुतर्फा उभे राहून टाळ्यांच्या गजरात धावपटूंचे

13 hours before