RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

अनुपम खेर यांच्याविरोधात तक्रार दाखल, मनमोहन सिंग यांच्या बदनामीचा आरोप

03 January 2019 at 15:28

अभिनेते अनुपम खेर सध्या आपला आगामी चित्रपट ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ मुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या राजकीय कारकिर्दीवर आधारित असणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून त्यानंतर वादाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसने चित्रपटावर आक्षेप घेतला असून यामधून गांधी कुटुंबाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान अभिनेता अनुपम खेर यांच्याविरोधात बिहार न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. चित्रपटातून काही मोठ्या लोकांची बदनामी केली जात असल्याचा आरोप करत ही तक्रार करण्यात आली आहे.

वकील सुधीर कुमार ओझा यांनी मुझफ्फरपूर मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात ही तक्रार दाखल केली आहे. न्यायालयाने तक्रार दाखल करुन घेतली असून 8 जानेवारीला उप विभागीय न्यायिक दंडाधिकारी न्यायालयात सुनावणी होणार आहे.

सुधीर ओझा यांनी आपल्या याचिकेत केलेल्या तक्रारीनुसार, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि त्यांचे मीडिया सल्लागार संजय बारु यांची भूमिका निभावत अनुपम खेर आणि अक्षय खन्ना यांनी त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवला आहे. यामुळे मला आणि अनेकांना वाईट वाटलं असल्याचंही त्यांनी याचिकेत म्हटलं आहे.

तक्रारीत त्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका वड्रा यांच्याही प्रतिमेला धक्का लावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांविरोधातही तक्रार करण्यात आली आहे.

अनुपम खेर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. अनुपम खेर या चित्रपटात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची भूमिका करत आहेत. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला. मात्र बुधवारी या चित्रपटाचा ट्रेलर यू ट्युबवरुन रहस्यमय पद्धतीने हटवण्यात आलेला आहे. अभिनेते अनुपम खेर यांनी यासंदर्भातलं ट्विट केलं.

यूट्यूबवर ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ सिनेमाचा ट्रेलर सर्च केला, तर तो ट्रेलर समोर येणं अपेक्षित आहे. मात्र यूट्यूबवर अनुपम खेर यांचे भूमिकेसंदर्भातल्या मुलाखतींचे व्हिडीओ समोर येत आहेत. मुळ सिनेमाचा ट्रेलर हा पन्नासाव्या क्रमांकावर आलेला पहायला मिळत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर काही नेटीझन्सी यू ट्यूब चित्रपटाचा ट्रेलर जाणून बुजून लपवत असल्याचं म्हटलं. या प्रकरणी यू ट्यूबने वेळेत लक्ष घालून मदत करावी अशी मागणीही खेर यांनी केली आहे.

मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार असणाऱ्या संजय बारू लिखित ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर- मेकिंग अँड अमेकिंग ऑफ मनमोहन सिंग’ या पुस्तकावर आधारित हा चित्रपट ११ जानेवारीला प्रदर्शित होत आहे.