कराड : शहरातील दत्त चौकात रविवारी दुपारी आझाद चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन दुचाकीवरून आलेल्या चारजणांनी हुल्लडबाजी करत रस्त्यात दुचाकी उभा करून वाहतूक रोखली. त्यांनी आरडाओरडा केल्याने दत्त चौक परिसरात तणाव निर्माण होवून लोकांची गर्दी झाली. दरम्यान, शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी धरपकड करून दोघांना ताब्यात घेतले, तर अन्य दोघांनी पोबारा केला.
घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दोन दुचाकीवरून चौघेजण रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास दत्त चौकात आले. साईबाबा मंदीरासमोर व आझाद चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चौघांनी त्यांच्याकडील एक दुचाकी रस्त्यात उभा केली. त्यानंतर आरडाओरडा करत त्यांनी पाठीमागून आझाद चौकाकडे जाणारी वाहने जबरदस्तीने थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तणाव वाढला आणि लोकांची गर्दी होवू लागली. शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी धरपकड करून दोघांना ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात नेले. मात्र अन्य दोघेजण पोलिसांची चाहूल लागताच पळून गेले. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता. त्यामुळे अधिकचा तपशील समजू शकला नाही.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |