सातारा : सदरबझारमधील एका हॉस्पीटलच्या औषधविक्रीतून तसेच दैनंदिन व्यवहारातून जमा झालेल्या तब्बल 57 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात शेखर गणपत शेळके (वय 21, रा.खिंडवाडी ता.सातारा) याच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत डॉक्टरने तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित शेखर शेळके हा 2017 पासून तक्रारदार यांच्या खासगी हॉस्पिटलमध्ये अकौंटट पदावर कामाला होता. शेळके याच्याकडे हॉस्पीटलच्या मेडीकलमधील औषध विक्री, हॉस्पीटलच्या दैनंदिन व्यवहारातून जमा झालेल्या रक्कमेचा हिशोब, तसेच त्याचा भरणा विविध बँकेत करण्याची जबाबदारी होती. हे काम करत असतानाच सर्व व्यवहार किर्दीत तसेच वहीत नोंदवून ठेवण्याचे काम शेळके करत होता. जून 2017 मध्ये डॉक्टरांनी हॉस्पीटलचे आर्थिक व्यवहार तपासले. यावेळी त्यांना औषधांची विक्री व भरणा यात सुमारे 40 हजार रुपयांचा फरक दिसून आला. डॉक्टरांनी शेळके याच्याकडे त्याबाबत विचारणा केली असता त्याने संबंधित रक्कम जमा करतो, असे सांगितले. डॉक्टरांनी त्याच्यावर विश्वास ठेवून यांनी पुन्हा त्याच्याकडेच आर्थिक व्यवहार सोपवले. यानंतर तीन ते चार महिन्यांनी पुन्हा डॉक्टरांनी आर्थिक व्यवहार तपासले असता, त्यांना 4 लाख रुपयांच्या रक्कमेचा फरक लागला. डॉक्टरांनी त्याबाबत विचारणा केल्यानंतर शेळके याने उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय वाढल्याने जुन 2017 ते 10 जाने 2018 जानेवारी या कालावधीतील आर्थिक व्यवहार तपासले. या तपासणीत मेडीकलची औषध विक्री, हॉस्पीटलमध्ये जमा होणार्या रक्कमेत 57 लाख 60 हजार रुपयांचा फरक आढळला. शेळके याने त्या कालावधीतील हिशोबाच्या वह्या, किर्दी गायब केल्याचेही नंतर समोर आले.
डॉक्टरांनी शेखरची अधिक माहिती घेतली असता त्याने शेळकेवाडी (ता.सातारा) येथे जमीन, सदरबझारमध्ये प्लॉट तसेच इतर ठिकाणी गुंतवणूक केल्याचे समजले. डॉक्टरांनी पैशांबाबत विचारणा करुन ते न दिल्यास पोलिस केस करणार असल्याचे बजावले. यावेळी शेखर शेळके याने पैसे फेडणार असल्याचे सांगून पोलीस केस करु नका, अशी विनंती केली. वेळ देवूनही शेळके याने पैसे न दिल्याने डॉक्टरांनी सोमवारी रात्री सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |