सातारा : गोडोली येथील साई मंदिरासमोरील शगुन या बेकरीवर बुधवारी रात्र दोन युवकांनी तलवारीसारखे धारदार शस्त्र नाचवून दुकानातील काउंटरवर ती मारुन 2 हजार रुपयांची खंडणी मागितली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून खंडणी न दिल्यास बेकरी बंद करण्याची धमकी दिली आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून घटनेने परिसरातील व्यापारी, दुकानदार, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विकी अडसूळ व सोहेल उर्फ स्वप्नील शेख (दोघे रा.शाहूनगर) यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात खंडणी मागून धारदार शस्त्र नाचवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अब्दुल अजीज छोटूभाई शेख (वय 70, रा.गोडोली) यांनी याबाबतची पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवारी दि. 4 रोजी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास शगुन या बेकरीमध्ये गिर्हाईकांची गर्दी होती. याचवेळी संशयित दोघे बेकरीच्या काउंटरजवळ आले. त्यातील एका संशयिताकडे तलवारीसारखे धारदार शस्त्र हातात होते व तो म्हणाला की, ‘मला दोन हजार रुपये द्या. नाहीतर दुकान आत्ताच्या आत्ता बंद करा.’ यावेळी संशयिताला त्याचा साथीदार ओढत असताना तलवार घेतलेल्या त्या युवकाने ते शस्त्र काउंटरवर जोरदार मारले. यामुळे काउंटरवर ठेवलेल्या वस्तू पडल्या व दुकानामध्ये आलेल्या गिर्हाईकांमध्ये भिती निर्माण झाले व गिर्हाईक पळून गेले.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |