05:51pm | Dec 05, 2019 |
वाई : रविवार दिनांक 15 डिसेंबर रोजी संपन्न होणाऱ्या गरवारे वाई हिल साईड हाफ मॅरेथॉन स्पर्धेला वाई, सातारा यासह देश-विदेशातील स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला असून यामध्ये जवळपास 3000 स्पर्धक सहभागी होणार आहेत. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे.
"रन फॉर फन" अशी टॅगलाईन असणारी ही स्पर्धा भरवण्याचा मुख्य उद्देश आरोग्यदायी चळवळ बळकट करणे असा आहे. मागील वर्षी पेक्षाही यंदाच्या वर्षी स्पर्धकांची संख्या वाढली असून यामध्ये महिला, मुले व ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग लक्षणीय आहे. स्पर्धेसाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने गेले महिनाभरापासून दर रविवारी प्रॅक्टिस होत आहे. या प्रॅक्टिस रन दरम्यान तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभत असून त्याद्वारे ही मॅरेथॉन संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. द्रविड हायस्कूलच्या ग्राउंड वरून सकाळी 6 वाजता प्रारंभ होणाऱ्या या स्पर्धेसाठी तीन किलोमीटर (फन रन), 7.5 किलोमीटर (ग्लॅडीएटर रन) तर 21 किलोमीटर हाफ मॅरेथॉन अशा विविध प्रकारात स्पर्धक धावणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना पाच लाख 55 हजाराहून अधिक बक्षिसे दिली जाणार आहेत. सहभागी स्पर्धकांना टी-शर्ट, बॅग, टाइमिंग चिप आदींचे वाटप दिनांक 14 रोजी साठे मंगल कार्यालय किसनवीर चौक येथे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत केले जाणार आहे. स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी वाईकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वाई हिलसाईड हाफ मॅरेथॉन समिती अध्यक्ष दिपक ओसवाल, क्रीडा प्रशिक्षक राजगुरू कोचळे यांनी केले आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |