सातारा : सातारा जिल्ह्यातील माणदेश हा सर्वात कमी पर्जन्यमान असलेला भाग आहे , पण इथल्या लोकांच्या जिद्दीपुढे निसर्गानेही हार मानली आहे. मुळात तुम्हाला तुमच्या मनाची ताकत आणि शक्तीची जाणीव झाली की कामाचे डोंगर उभे राहतात. १ मे रोजी कुकुडवाड मध्ये गाव पाणीदार करण्यासाठी आठ हजार चारशे पेक्षा अधिक लोकांनी सकाळी श्रमदान केलं, हा सामुहिक कामाचा उच्चांक आहे. यातून जे काम बाहेर येणार आहे ते खुप मोठे आणि या राज्याला दिशा देणारे असेल. २६०० हेक्टर क्षेत्रावर जलसंधारणाची काम, तीन कोटीची लोक वर्गणी, १६ हजार हात कामाला लागल्यानंतर काय होते ते उद्या महाराष्ट्र पाहिल... त्यावेळी माणदेशाच्या कपाळावरली दुष्काळाची रेषा पुसली जावून ती अभिमानाची रेषा होइल असे भावनिक उद्गगार जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी बोलून दाखविले.
जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी १ मे रोजी कुकुडवाड, विरळी या गावाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी या परिसरातले सुपूत्र आणि मंत्रालयात उद्योग विभागाचे उपसचिव नामदेव भोसले, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, माणच्या तहसीलदार सुरेखा माने, मुळचे इथलेच मुंबई, पुणे इथे वास्तव्यास असलेले अनेक व्यावसायीक, नोकरदार यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सायंकाळी विरळी गावाच्या डोंगर माथ्यावर गेल्या. त्यावेळी संपूर्ण गाव श्रमदानासाठी या डोंगर माथ्यावर उपस्थित होते. जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीमुळे लोक भारावून गेले होते. तिथल्या लोकांशी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी हितगुज केले, 'तुम्ही सर्वजन एकत्र आलात, यातच पहिली लढाई तुम्ही जिंकलात. आता दुसरी लढाई दुष्काळाबरोबरची आहे. तुम्ही त्यावर मात करण्यासाठी थेंब न थेंब जिरविण्याची व्यवस्था करत आहात. त्यामुळे तीही लढाई तुम्ही जिंकणार आहात. राहिला प्रश्न बक्षिसाचा, शाश्वत पाणीसाठा निर्माण होणार आहे, हे तुमच्यासाठी आयुष्यभराचे बक्षिस आहे.
यावेळी १०२ वर्षाच्या आजीही जिल्हाधिका-यांना भेटायला आल्या, त्यावेळी लोकांनी सांगितले. औषध उपचारासाठीच्या पुंजीतून २००० हजार एवढी वर्गणी या पवित्र कार्यासाठी दिल्याची भावना आजींनी बोलून दाखविली . जिल्हाधिकारी श्वेता सिंघल हे पाहून भारावून गेल्या होत्या.
कुकुडवाडच्या कार्यक्रमात बोलताना जिल्हाधिकारी म्हणाल्या, या सर्व अफाट कामाचे श्रेय तुमचे आहे. तुमच्या शक्तीतून निर्माण झालेल्या या श्रमाच्या ज्योतीत ती तेवत राहावी, यासाठी तेल टाकण्याचे काम प्रशासन म्हणून आमचे आहे, ते काम प्रांताधिकारी आणि तहसीलदार, संबंधित विभागाचे अधिकारी अतिशय श्रध्देनी करत आहेत. आज पर्यंत उन्हाळा सुरु झाल्याची चाहूल कुकुडवाडच्या टँकर मागणी वरुन होत असे आता हे चित्र मागच्या वर्षी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामापासून बंद झाले असून आता तर वाटर कप स्पर्धेच्या निमित्ताने तुम्ही प्रचंड मोठे काम हाती घेतले आहे. त्यात तुम्हाला खुप मोठे यश मिळणार असल्याची शाश्वती मला आहे.
* कुकुडवाड येथे ८,४६० लोकांनी केले पाण्यासाठी महाश्रमदान
* तीन कोटी रुपयाची झाली लोक वर्गणी
* २६०० हेक्टरवर होतेय एरिया ट्रीटमेंट
* १०२ वर्षाच्या आजीने दिले लोक वर्गणीसाठी दोन हजार
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |