कराड : भारत सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्कारापैकी एक पुरस्कार मानल्या जाणाऱ्या ‘पद्म पुरस्कार २०१९’ साठी राज्य शासनाने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी युवकमित्र हभप बंडातात्या कराडकर यांच्याकडून माहिती मागवली आहे. मात्र, ‘आपण कोणताही पुरस्कार स्वीकारत नाही', असे सांगत बंडा तात्या कराडकर यांनी ‘पद्म पुरस्कारा'साठी केंद्र सरकारकडे शिफारस पाठवण्यासाठी राज्य शासनाला स्वत:च्या कार्याविषयीची माहिती देण्यास नम्रपणे नकार दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील वर्षीच्या पद्म पुरस्कारासाठी हभप बंडातात्या कराडकर यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे करावी, अशी विनंती पुणे येथील मातृभूमी दक्षता चळवळीचे राष्ट्रीय संयोजक मुबारक शेख यांच्याकडे केली आहे. त्याबाबतचे पत्र बंडातात्या कराडकर यांना राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून कोपर्डे हवेली (ता. कराड, जि. सातारा) येथील ‘वैष्णव सदन' येथील निवासस्थानी (गो - शाळा) पाठवण्यात आले आहे. प्रस्ताव व आपल्या कार्याची माहिती १४ सप्टेंबरला सकाळी 10 वाजेपर्यंत पाठवावी. केंद्र सरकारकडे त्वरित प्रस्ताव पाठवणे आवश्यक असून सहकार्य करावे, अशी विनंतही या पत्राद्वारे करण्यात आली आहे. मात्र, हभप बंडातात्या कराडकर यांनी आपण कोणतेही प्रस्ताव स्वीकारत नाही असे सांगत प्रस्ताव पाठवण्यासाठी आवश्यक ती माहिती देण्यास नम्रपणे नकार दिला आहे. वडगाव हवेली (ता. कराड) येथे बुधवारी रात्री हभप बंडातात्या कराडकर यांनी आपली ही भूमिका स्पष्ट केली.
कोण आहेत हभप बंडातात्या कराडकर
हभप बंडातात्या कराडकर यांनी १९९६ साली राज्यात व्यसनमुक्त युवक संघ स्थापन केला. युवा पिढी व्यसनांच्या आहरी जाऊन भरकटते आणि त्याचा त्यांच्या कुटूंबासह समाजाला मोठा फटका बसतो असे आवाहन करत गेली २० वर्ष बंडातात्या कराडकर हे गावोगावी जाऊन युवकांमध्ये व्यसनमुक्तीसाठी प्रबोधन करत आहेत. त्याचबरोबर गुरूवर्य भगवान मामा कराडकर शिक्षण संस्थेची स्थापना करत फलटण (जि. सातारा) येथे बंडातात्या कराडकर आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रबंधू राजीव दिक्षित गुरूकूल या शाळेच्या माध्यमातून वारकरी शिक्षणही देतात. राज्यातील पहिली वारकरी शिक्षण देणारी ही शाळा आहे. त्याचबरोबर युवा पिढी संस्कारक्षम घडावी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यापासून प्रेरणा घ्यावी म्हणून हभप बंडातात्या कराडकर हे राज्यातील गडकोटांवर युवकांसाठी ‘प्रतापी संस्कार सोहळ्यां’चे आयोजन करतात. १९९७ पासून हे कार्य आजही अखंडपणे सुरू आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |