सातारा : सातारा जिल्ह्यातील प्रसिध्द विधिज्ञ अॅड.विकास पाटील-शिरगावकर यांच्या घरावर अज्ञातांनी शुक्रवारी दुपारी दगडफेक केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. हल्ला करण्यामागचे कारण अद्याप समोर आले नसून यापूर्वीही अशाप्रकारे त्यांच्या घरावर हल्ला झालेला आहे.
याबाबत माहिती अशी, अॅड.विकास पाटील-शिरगावकर हे कृष्णानगकर येथे कुटुंबियासमवेत वास्तव्य करत आहेत. शुक्रवारी ते कामानिमित्त जिल्हा न्यायालयात होते. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घरामध्ये त्यांची पत्नी, मुले असताना अचानक एका जमावाने त्यांच्या घरावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे कुटुंबिय घाबरुन गेले व बचावासाठी आरडाओरडा केला. दगडफेक झाल्याचे परिसरात समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता हल्लेखोर तेथून पळून गेले. या घटनेची माहिती पाटील कुटुंबियांनी वकीलांना दिल्यानंतर त्यांनी शहर पोलिसांना हल्ल्याबाबतची माहिती दिली.
सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता हल्लेखोरांनी घरावर दगडफेक केल्यामुळे घराच्या काचा फुटलेल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन तपासाची चक्रे गतीमान केली. दरम्यान, अॅड. विकास पाटील-शिरगावकर हे तत्कालीन जिल्हा सरकारी वकील म्हणून कार्यरत होेते. तसेच अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये त्यांची शासनाने विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्तीही केलेली आहे. रात्री उशीरापर्यंत मात्र याबाबत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |

तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |