01:20am | May 23, 2019 |
कराड : शेतातील रस्त्याच्या कारणावरून वाघेरी (ता. कराड) येथे दोन सख्ख्या भावांच्या कुटुंबात झालेल्या सशस्त्र मारामारीत गंभीर जखमी झालेल्या अभिनंदन पिसाळ (रा. करवडी, ता. कराड) यांचा उपचार सुरू असताना मृत्यु झाला. पिसाळ यांच्या मृत्युनंतर हल्ल्यातील संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली तालुका पोलिसांनी सुरू केल्या आहेत.
वाघेरी येथील महादेव संपत पवार (वय 48) आणि सदाशिव संपत पवार (वय 38) या सख्ख्या भावांमध्ये शेतातील वाटेवरून बरीच वर्षे वाद सुरू होता. दि. 5 मे रोजी महादेव आणि सदाशिव या भावांमध्ये रस्त्याच्या कारणावरून वाद झाला. वाद वाढत गेल्यावर दोन्ही कुटुंबात धुमश्चक्री उडाली. त्यात महादेव पवार यांचे जावई अभिनंदन पिसाळ गंभीर जखमी झाले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मारामारीनंतर महादेव संपत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदाशिव संपत पवार, विशाल सुखदेव साळुंखे, गणेश लक्ष्मण साळुंखे, युवराज रामचंद्र मोहिते, योगेश सुखदेव साळुंखे, लक्ष्मण बापू साळुंखे, वैशाली सदाशिव पवार, संगीता सुखदेव साळुंखे, मंगल धनाजी मोहिते (सर्व रा. वाघेरी ता. कराड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तसेच सदाशिव संपत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महादेव संपत पवार, अभिनंदन पिसाळ, आनंदा पिसाळ, अनिता महादेव पवार, आदर्श महादेव पवार (सर्व रा. वाघेरी ता. कराड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, जखमी अभिनंदन यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना बुधवारी अभिनंदन यांचा मृत्यु झाला. त्यामुळे अभिनंदन यांच्यावर हल्ला केलेल्या गुन्ह्यातील संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली पोलिसांनी सुरू केल्या आहेत. या गुन्ह्याचा तपास तालुका पोलीस निरिक्षक अशोक क्षीरसागर करत आहेत.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |