03:46pm | Oct 21, 2018 |
फलटण : जिवनामध्ये आपले विचार नेहमी सशक्त व सकारात्मक असायला हवेत. तुमच्या सवयी तुमचे चारीत्र्य घडवितात तर तुमच चारीत्र्य तुमची प्रतिष्ठा ठरविते. त्यामुळे कृती व चारीत्र्य यास फार महत्व असून त्यास जाणिवपुर्वक चांगलेपणाने घडवा. कोणतीही अपेक्षा न ठेवता समाजासाठी तळमळीने ज्या मोजक्या प्रवृत्ती आज कार्यरत आहेत त्यामध्ये डॉ. प्रसाद जोशी यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल असे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वासराव नांगरे पाटील यांनी केले.
जागतिक अस्थिरोग दिनाचे औचित्याने जोशी हॉस्पिटल यांच्यावतीने फलटण येथे म्यारेथॉन व युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर होते. अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजीतसिंह नाईक निंबाळकर, सौ. रुपाली नांगरे-पाटील, डॉ. प्रसाद जोशी, डॉ. प्राची जोशी आदी माण्यवरांची यावेळी व्यासपिठावर प्रमुख उपस्थिती होती.
कर्म हे मनुष्य जातीसाठी आहे. ज्याला कोणतीही अपेक्षा नाही. हि प्रवृत्ती आहे याच कर्माच्या प्रवृत्तीने डॉ. प्रसाद जोशी यांनी या कार्यक्रमाचे आयोजण केले असल्याचे सांगून नांगरे-पाटील म्हणाले, रोजच्या जगण्यातला तोच तोचपणा टाळा, नविन चांगले मार्ग तयार करा. नवनविन संकल्पना राबवा, आपल्यातील सुप्त गुणांना ओळखून त्यांना चालना द्या, चांगली स्वप्ने पहा, चांगले ध्येय समोर ठेवा त्याच्या पुर्तीसाठी सातत्याने प्रयत्नशील रहा असे आवाहनही त्यांनी यावेळी युवकांना केले.
आजच्या काळात प्रतिष्ठा असणारी जी थोडकी क्षेत्र आहेत, त्यामध्ये वैद्यकीय क्षेत्र हे महत्वपुर्ण आहे. मात्र सुदैवाने किंवा दुर्दैवाने आज या क्षेत्राला नक्की सेवा म्हणायचं की व्यवसाय अशा उंबरठ्यावर हे क्षेत्र आहे असे सांगून अभिनेते डॉ. कोल्हे म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मंडळींपैकी खुप मोजकी माणसं अशी आहेत ज्यांना सेवा व व्यवसाय यांच्यामध्ये सांगड घालता आली. यामध्ये डॉ. प्रसाद जोशी यांचा प्राधान्याने उल्लेख करावा लागेल, यामुळेच पेशंटच्या मनातही डॉ. जोशी यांच्याविषयीचा आदर व विश्वास दिसून येतो. जोवर पेशंट बरा होत नाही तोवर डॉक्टर हा नक्कीच देव असतो परंतू जेव्हा बील देण्याची वेळ येते तेव्हा मात्र त्यांच्याकडे खीसेकापूंच्या नजरेतून पाहिले जाते हे मी दुर्दैव मानतो अशी खंतही यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली. तुम्ही माणूस म्हणून जन्माला आला आहात. तुम्ही कोणत्याही जातीत, धर्मात, पंथात व प्रांतात जन्माला आला असलात तरी तुमच्या जगण्याचा तुमच्या घराला, गावाला व राष्ट्राला अभिमान वाटेल अशा प्रकारे जगण्याचे ध्येय आजच्या तरुणाईने ठेवावे असे आवाहनही डॉ. कोल्हे यांनी यावेळी केले.
कार्यक्रमात प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते डॉ. प्रसाद जोशी यांच्या जीद्द या स्मरणीकेचे प्रकाशन करण्यात आले.तसेच जेष्ठ नागरीकांना मोफत काठी वाटप व म्यारेथॉन विजेत्यांना बक्षिस वाटप करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत, सत्कार व प्रास्तविक डॉ. प्रसाद जोशी यांनी केले. सुत्रसंचलन माधुरी दाणी यांनी केले. आभार डॉ. प्राची जोशी यांनी मानले. कार्यक्रमास फलटण शहर व तालुक्यातील डॉक्टर्स, पेशंट, जेष्ठ नागरिक, महिला, युवक वर्ग मोठ्या संखेने उपस्थित होता.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |