RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

केंद्रासह राज्यातील सरकार जाहिरातबाज

22 November 2018 at 23:32

सुप्रिया सुळेंची टीका, मराठा आरक्षणाबाबत अजुन गोंधळ

कराड : मोदी हे जादूगर आहेत आणि सर्व परिस्थिती बदलणार, असे निवडणुकीपूर्वी भासविण्यात आले होते. पण, या सरकारमुळे समाजात झालेला एक बदल सांगा, असा प्रतिप्रश्न करून केंद्र आणि राज्यातील सरकार जाहिरातबाज निघाल्याची टीका खा. सुप्रिया सुळे यांनी केली. दरम्यान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे आरक्षणाबाबत मराठा समाजात गोंधळ असून याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल जनतेसमोर यायला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. 

 येथील प्रीतिसंगमावरील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी आल्या असताना त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी सदानंद सुळे,  नंदकुमार बटाणे, माजी नगरसेवक गंगाधर जाधव, नाना पवार उपस्थित होते.

 खा. सुळे म्हणाल्या, सत्तेवर येण्यापूर्वी या सरकारने दिलेली किती आश्वासने पूर्ण केली. उलट पेट्रोल-डिझेल, गॅस सिलिंडरच्या किंमती वाढतच आहेत. किती नोकर्‍या मिळाल्या, किती नवीन उद्योगधंदे आले, किती लोकांच्या खात्यात 15 लाख जमा झाले, सर्वजण शैक्षणिक प्रवाहात आले का, सर्वांना शैक्षणिक प्रवेश मिळाला का, रेल्वे, विमानतळ कोठे उभे राहिले का? मग या सरकारचे  गेल्या चार वर्षातील मोठे काम अथवा समाजात सरकारमुळे झालेला बदल दाखवा. या सरकारने काम न करता केवळ पेट्रोल पंपावर आणि पेपरमध्ये केवळ जाहिरातबाजी केली. त्यामुळे या सरकारला जनतेची फसवणूक करणारे सरकार म्हणावे लागेल. सध्या मराठवाड्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. अशा वेळी शासनाने काय उपाययोजना केल्या आहेत, असे सवाल त्यांनी केले.

सर्व पातळ्यांवर अपयशी ठरलेल्या सरकारच्या कारभाचा भांडाफोड करण्यासाठी राष्ट्रवादीसह काँग्रेसनेही राज्यभर यात्रा काढली. त्यातून लोकांनाही सरकारची फसवेगिरी लक्षात आली. येत्या निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या माध्यमातून लढणार असल्याचे सांगून सुळे म्हणाल्या, जागा वाटपात एखाद्या-दुसर्‍या मतदार संघाची अदलाबदल होऊ शकते. मात्र, त्याबाबतचा निर्णय दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांच्या चर्चेतून आणि संमतीने होऊ शकेल. महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री लाभणार का, या प्रश्नावर सुळे म्हणाल्या, मी खासदार आहे. सहा विधानसभा मतदार संघ आणि सहा आमदार लोकसभा मतदार संघात येतात. मी दिल्लीत रमले आहे आणि तेथेच बरी आहे. मात्र, मुख्यमंत्री हा कर्तृत्ववान आणि संवेदनशील असला पाहिजे. त्याच्यात कार्यक्षमता असायला हवी.

जावली तालुक्यातील अवैद्य दारू विक्रेत्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी

गेली ११ वर्ष जावली तालुक्यात सुरु असलेली १३ दारू दुकाने महिलांनी व व्यसनमुक्ती संघटनांनी ऐतिहासिक पाऊल उचलून बंद केली होती.

4 hours before

एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा

कराड जवळील एका गावात नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4 hours before

तलावात बुडून युवकाचा मृत्यू

बामणवाडी (ता.कराड) येथे जांभळा नावच्या शिवारात असलेल्या कृषि विभागाच्या पाजर तलावात युवकाचा बुडून मृत्यू झाला.

4 hours before

सातार्‍यातून ट्रॅक्टर, दोन दुचाकी चोरी

सातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकठिकाणाहून ट्रॅक्टर व दोन दुचाकी चोरुन नेला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

4 hours before