सातारा : जुगार, मटकाची पोलिसांना माहिती देत असल्याचा राग मनात धरुन समीर कच्छीच्या टोळीतील दोघांनी पत्रकार असणार्या एकास अडवून लाकडी दांडक्याने मारहाण केली. शाहूपुरी पोलिस ठाण्यात याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला असून मटका व्यवसायिकांनी घातलेल्या या धिंगाण्यामुळे सातार्यातील कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
ओमकार महाडीक व प्रकाश चव्हाण (दोघे रा.चिंतामणी कॉलनी, शाहूपुरी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून रोहित चित्तरंजन भुतकर (वय 30, रा.शाहूपुरी) यांनी याबाबतची पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. भुतकर हे एका वृत्तवाहिनीसाठी काम करत आहेत. मटकाकिंग समीर कच्छी याच्या सांगण्यावरुन दोघांनी हल्ला केला असल्याचे तक्रारदार यांनी तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 रोजी रात्री सव्वानउ वाजता तक्रारदार रोहित भुतकर हे दुचाकीवरुन घराकडे निघाले होते. फोन आल्याने ते दुचाकी बाजूला लावून बोलत असताना त्याठिकाणी संशयित दोघे आले व त्यांनी लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी ‘तू आमचा मटका पाडला आहेस. तू आमच्या मटका व्यवसायाची व मालक समीर कच्छी यांची पोलिसांना माहिती देतोस. तुला मस्ती आली आहे,’ असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी केली. तसेच संशयितांनी लाकडी दांडक्याने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करत दुचाकीचेही नुकसान केले. या घटनेनंतर संशयित तेथून पसार झाले.
शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर जखमी तक्रारदार रोहित भुतकर यांनी सिव्हीलमध्ये उपचार घेतले रविवारी याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |