सातारा : जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे विनायक बाळेश्वर शिंगनाथ (वय २५, रा, केसरकर पेठ, सातारा) या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे सिव्हील परिसरात वातावरण तणावपूर्ण बनले हाोते. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पोनि प्रदीपकुमार जाधव यांनी दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतल्यामुळे तणाव निवळला.
विनायक शिंगनाथ याला शनिवारी दुपारीउलट्या झाल्याने त्याचा मावस भाऊने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. अशक्तपणा असल्याने डॉक्टरांनी उपचारासाठी दुपारी ३.३० च्या सुमारास वॅार्ड नं २ येथे दाखल केले. त्यानंतर वॅार्डमधील परिचारिकेने तपासणी करत गोळ्या दिल्या. रात्री ८ नंतर सलाईन लावण्यात आले. पोटात दुखत असल्याचे त्याने संबंधित परिचारिकेला सांगितले होते, मात्र, त्यांनी दुर्लक्ष केल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. रात्री १२.३० च्या सुमारास त्याला जुलाब झाला व विनायकला जास्त त्रास होऊ लागल्याने नातेवाईकांनी संबंधित परिचारिकेना याबाबत सांगण्यास गेले मात्र त्या गाढ झोपेत होत्या. त्यांना याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर रात्री २.३० च्या दरम्यान जास्त त्रास होऊ लागल्याने नातेवाईकांनी उपचाराबाबत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे परिचारिकांनी विनायकला औषधाची गोळी व इंजेकशन दिले. त्यानंतर १५ मिनिटात त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे नातेवाईक संतापले. त्यांनी डॉक्टर व परिचारिकेच्या हलगर्जीपणामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. पोनि प्रदीपकुमार जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत घडलेल्या प्रकाराची माहिती घेत नातेवाईकांची समजूत काढली. संतप्त नातेवाईकांनी संबंधित डॉक्टर व परिचारिकावर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यावर पोनि जाधव यांनी संबंधित दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर अखेर नातेवाईकांनी विनायकचा मृतदेह ताब्यात घेतला.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |