01:57pm | Oct 10, 2019 |
बिजवडी : माण मतदारसंघातून आपल्याला शिवसेनेची अधिकृत उमेदवारी मिळाल्याने संपूर्ण मतदारसंघात भगवे वातावरण तयार झाले आहे. महिला मेळावा व उमेदवारी अर्जाच्या शक्तीप्रदर्शनात याची रंगीत तालीम झाली आहे. पण येणाऱ्या दहा दिवसात विरोधकांची झोप उडवत माण खटाव मतदारसंघात मोठ मोठी भगवी वादळे आणणारच असल्याचा सूचक इशारा माण खटावचे युवानेते व शिवसेनेचे अधिकृत उमेदवार शेखरभाऊ गोरे यांनी विरोधकांना दिला आहे.
दहिवडी ता.माण येथील मतदारांशी बोलताना ते बोलत होते.यावेळी विजय जाधव, पंढरीनाथ जाधव, समीर जाधव, जाधव, गोरख जाधव, गणेश मुळीक, योगेश जाधव, दिलीप जाधव, विशाल जाधव आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने महिला व तरूण कार्यकर्ते उपस्थित होते.
शेखरभाऊ गोरे म्हणाले, माण खटाव मतदारसंघ हा पूर्वीपासून शिवसेनेचा होता. मात्र हा मतदारसंघ मित्रपक्षाने घेतला असतानाही शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपल्यावर विश्वास टाकत आपल्याला शिवसेनेची अधिकृत उमेदवारी दिली आहे. त्यांचा विश्वास सार्थकी लावत आपण मतदारसंघातील घरोघरी पोहचलो आहोत. त्यामुळे मतदारसंघात भगवे वातावरण तयार झाले आहे.हेच वातावरण शिवसेनेला आमदार करून देणार आहे.
मतदानाला अजून दहा दिवस बाकी आहेत.या दहा दिवसात विरोधकांची झोप उडवत मतदारसंघात भगवे वादळ तयार करणार आहे.साथ हवी ती फक्त तुम्हा सर्वांची.महिलांना होममिनिस्टरचे माध्यमातून व्यासपीठ मिळवून दिल्याने जिथे जाईल तिथे महिलांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळत आहे.ही निवडणूक आता महिलांनीच ताब्यात घेतल्याचे दिसून येत आहे. अन एकदा महिलांनी हातात कोणते कार्य घेतले की ते यशस्वीच करतात. त्यामुळे मला खात्री आहे की या निवडणूकीत आपल्या आमदारकीत महिलावर्गांचा सिंहाचा वाटा असणार आहे.
मतदारसंघातील गावांगावात, वाड्यावस्त्यांवर आपले कार्यकर्ते तसेच विरोधकांचे कार्यकर्ते असे न पाहता जे मदतीसाठी येतील त्यांना आश्वासन न देता ऑन द स्पॉट विविध कामांसाठी करोडो रूपयांची कामे स्वखर्चातून करून दिली आहेत. मागेल त्यांना पाणी देत १६ टँकरद्वारे नागरीकांची व मुक्या जनावरांची तहान भागवली आहे. मोफत रूग्णवाहिकेच्या माध्यमातून अनेकांचे जीव वाचवले आहेत. जलसंधारणाच्या कामात प्रत्येकवर्षी डिझेलसह पोकलेन मशीनरी देऊन त्या कामांना पाठबळ देण्याचे काम केले आहे. गरजू शालेय विद्यार्थ्यांची फी भरून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले आहे. तर अनेक गरजू, असह्य नागरीकांना मदत केली आहे. याच मदतीचे आशीर्वाद नागरीकांकडून मिळत आहेत. त्यांच्या आशीर्वादामुळेच मातोश्रीवरून आपल्याला शिवसेनेची अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. तुमच्या साथीने या मतदारसंघात बदल घडवत प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवत इतिहास रचू, असे आवाहनही शेखरभाऊ गोरे यांनी केले आहे.
दहा दिवसात येणाऱ्या भगव्या वादळाची उत्सुकता..!
शेखरभाऊ गोरे यांनी या दहा दिवसात मतदारसंघात मोठ मोठी भगवी वादळे आणणार असल्याची वल्गना केली आहे. त्यामागे निश्चितच मतदारसंघात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे शेखरभाऊ गोरेंनी उचललेल्या शिवसेनेच्या भगव्याला कोण कोण साथ देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले.या भगव्या वादळांची माण खटावमधील जनतेला उत्सुकता लागून राहीली आहे.
आपल्याला आमदार करण्यासाठी मतदारसंघातील अनेकजण इच्छुक ...!
माण खटाव मतदारसंघात आपल्याला शिवसेनेची अधिकृत उमेदवारी मिळाल्याने कार्यकर्त्यांत व जनतेत नवचैतन्य निर्माण झाले आहे.कार्यकर्ते मोठ्या जोमाने कामाला लागले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या सुटलेल्या धनुष्यबाणाला आता कोणीच थांबवू शकत नाही.विरोधकांकडील अनेकजण आपल्या प्रवाहात येण्यासाठी इच्छुक असून येणाऱ्या दहा दिवसात त्यांना सामील करून या मतदारसंघात नवा इतिहास घडवणार आहे.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |