सातारा : सातारा शहराची तहान मिटवण्यासाठी २०० वर्षापूर्वी छत्रपती शाहू महाराजांच्या पश्चात छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी महादरे तळे निर्माण केले. यावेळी खोदलेल्या तळ्याला घडीव दगडांच्या वापरातून आकार देण्यात आला. सातारा पालिकेने हे तळे स्वच्छ करण्याचा संकल्प केला आणि जलसंपदा विभागाची यंत्रसामुग्री वापरण्यासाठी नुकताच धनादेशही देण्यात आला. त्यामुळे गाळ काढण्याचे काम सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे काम करताना पाण्याचा वापर पूर्ववत सुरु करावा. अन्यथा येथे पर्यटन पोइंट विकसित करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
सातारा शहराची भौगोलिक रचना वेगळी असून शहराला चारही बाजूंनी पाणी पुरवठा करण्यासाठी छोटे-छोटे प्रकल्प गेल्या काही वर्षांमध्ये उभारण्यात आले. मात्र, सातारकरांना चोवीस तास पाणी उपलब्ध करून देण्यात एमजीपी-पालिकेला यश मिळाले नाही. पूर्वी महादरे तळ्यातील पाणी शहराच्या उत्तर भागासह अन्य भागाला दिले जात होते. घडीव दगड आणि खापरी पाईपच्या माध्यमातून तळ्यातील पाणी पुढे पाण्याच्या डब्यांमध्ये साठवण्यात येत. हेच पाणी मंगळवार तळे, कमळ तळे (शाहूकला मंदिर समोर), मोती तळे आणि काही ठिकाणी शहरात आणले गेले. या डब्या म्हणजे तळ्याच्या जलवाहिन्या असल्या तरी तेंव्हा त्या शहरासाठी रक्तवाहिन्याच होत्या. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये विकासाचा विंचू शहराच्या उत्तर भागात चांगलाच फोफावला. वाढणाऱ्या इमल्यांसोबत डब्या आणि खापरी पाईप मोडून बाजूला पडल्या. प्रशासनाने लक्ष देत कारवाई करणे अपेक्षित असताना ते झाले नाही. महादरे तलावात साठणारे पाणी निचरा होत नसल्याने तुंबून राहू लागले. पाण्याचा वापर जेमतेम होत असताना तळे दुर्गंधीच्या विळख्यात सापडले. आता तळ्यातील गाळ काढण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे. तळ्यातील गाळ निघेल, पण तळे वापरात राहणार का, हा सवाल उपस्थित झाला आहे.
दुष्काळाव्यतिरिक्त बारमाही वाहणारे तळे बांधल्यापासून पहिल्यांदाच उपसण्यात आल्यामुळे तळ्याची बांधणी आणि तत्कालीन बांधकाम पाहण्यासाठी पुणे-मुंबई येथून मोठ्या संख्येने पर्यटक तळे पाहण्यासाठी येत आहेत. तळ्याची दोन्ही बाजूंकडून तळ्यात उतरण्यासाठी घडीव पायऱ्यांचा जिना आहे. तळ्याच्या उत्तरेला दोन डब्या असून यामध्ये यवतेश्वरच्या पायथ्याशी असलेल्या झरयांमधून साठलेले पाणी आणले जात. तळ्याकडून पूर्वेला पाणी वाहून नेणाऱ्या घडीव दगडांसह त्या डब्या अद्यापही सुस्थितीत आहेत. हा ऐतिहासिक ठेवा पाहण्यासाठी दिवसेंदिवस गर्दी वाढत असून तळ्याच्या खाली असलेली फरसबंदी गाळ काढण्याचे काम सुरु झाल्यानंतर पहायला मिळणार आहे. सुट्टीचे दिवस असल्याने बाल चिमुरड्यांची गर्दीही चांगलीच वाढत आहे.
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |

महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |