12:18am | Sep 20, 2018 |
कराड : काँग्रेस पक्षात आपल्यापेक्षा कोणी वरचढ ठरतो आहे हे लक्षात येताच त्या प्रत्येकाला ठेचण्याचीच आ.आनंदराव पाटील यांची वृत्ती आहे. त्यांची ही हुकूमशाही यापुढे खपवून घेतली जाणार नाही असा इशारा विद्यार्थी कॉग्रसेचे नेते शिवराज मोरे यांनी दिला आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील यांच्या मुलावर कराड शहर पोलिसात दाखल झालेली तक्रार माझ्यामुळेच दाखल झाली आहे. हा पुर्वग्रह मनात ठेवून त्यांनी पोलिसांवर दबाव आणून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे, असे स्पष्टीकरण शिवराज मोरे यांनी निवेदनातून केले आहे.
शिवराज मोरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, वास्तविक 12 सप्टेंबर रोजी प्रताप आनंदराव पाटील यांच्या विरूद्ध कराड शहर पोलिस ठाण्यात दमदाटी व मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. तो दाखल करण्यामागे शिवराज मोरे यांचाच हात आहे असा समज करून घेवून आ.आनंदराव पाटील यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांच्या पेट्रोल पंपावर हा प्रकार झाला आहे. तो त्यांच्या पंपावरील कर्मचार्यांकडून दाखल केल्याचे दिसते. मात्र तो गुन्हा खोटा आहे.
त्यांच्या तक्रारीप्रमाणे 13 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता घटना घडली होती. असे असताना 14 सप्टेंबरला रात्री नऊच्या सुमारास हा गुन्हा का दाखल केला आहे. तो गुन्हा कर्मचार्यास दमदाटी केल्याबाबत दाखल केला असुन त्यात पैसे बुडवल्याचे जाणीवपूर्वक व खोटा उल्लेख केला आहे. त्याबाबत आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई जिल्हाध्यक्ष आ.आनंदराव पाटील तसेच हा गुन्हा दाखल करण्यामागे ज्यांचा कोणाचा हात आहे त्यांच्यावर करणार आहोत. पक्षात वरचढ ठरलो म्हणून माझा राजकीय व्देष आनंदराव पाटील करीत आहेत. प्रताप पाटील हे त्यांचे पुत्र एवढीच पक्षात त्यांची ओळख आहे. त्यामुळे पुत्र प्रेमापोटी कॉंग्रेसच्या बांधणीला व युवकांच्या संघटनालाच थेट धक्का पोचवून पक्षद्रोही काम ते करत आहेत. यापुढे त्यांची हुकूमशाही लोकशाही पद्धतीने आम्ही हाणून पाडू असाही इशारा शिवराज मोरे यांनी निवेदनात दिला आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |