02:36am | Jan 19, 2020 |
सातारा : चित्रपटसृष्टीने अनेक क्रांती घडवल्या त्यातून अनेक प्रबोधनात्मक चित्रपट तयार झाले. चित्रपट हे व्यक्तीमत्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी केले.
अनुभव फिल्म कलबच्या वतीने आयोजित भारतीय पॅनोरमा चित्रपट महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी साताऱ्याचे प्रसिद्ध दिग्दर्शक नितीन दीक्षित, प्रमुख पाहुणे तुषार पाटील, अनुभव फिल्म क्लब सातारा अध्यक्ष शिरीष चिटणीस, दीपलक्ष्मी पतसंस्था व्यवस्थापक विनायक भोसले यांची उपस्थिती होती.
क्षीरसागर पुढे म्हणाले दिग्दर्शक नितीन दीक्षित यांनी वेगळी वाट चोखाळल्यानेच त्यांचे नाव देशभर होत आहे. नितीनजी यांचा कडवी हवा हा चित्रपट पॅनोरमा महोत्सवात दाखवला जातोय ही सातारकरांसाठी भूषणांवह बाब आहे.
शिरीष चिटणीस म्हणाले, "प्रादेशिक भाषांचे निवडक व उत्तम चित्रपट पॅनोरमासाठी निवडले जातात. साताऱ्याच्या भूमीपुत्राचा चित्रपट पॅनोरमामध्ये येणे ही बाब सातारकरांसाठी मैलाचा दगड आहे. हे दर्जेदार चित्रपट चित्रपट रसिकांसाठी पर्वणी ठरतील, अशी अपेक्षा चिटणीस यांनी व्यक्त केली.
सातारकरांच्या ऋणात कायम राहू इच्छितो, अशा भावना नितीन दीक्षित यांनी सत्कारास उत्तर देताना प्रकट केल्या. ते म्हणाले 1992 साली मी पहिली एकांकिका लिहली होती. त्यानंतर जीवनाच्या अनेक टप्प्यातून जाताना2017 रोजी कडवी हवा हा बुंदेलखंडी भाषेचा हा चित्रपट हा आपण बनवला. त्यानंतर हलका नावाचा आपला आगामी प्रोजेक्ट येत असल्याचे दीक्षित यांनी सांगितले. अनुभव परिवाराचे उपाध्यक्ष गिरीश कुलकर्णी, सहसचिव अमित द्रविड, रविंद्र कळसकर, लक्ष्मण कदम, हेमंत भुजबळ, दत्तात्रय सावंत गुलाब, शुभमं बल्लाळ, शांताराम पवार आदी यावेळी उपस्थित होते.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |