02:48am | Oct 09, 2019 |
पॅरिस: दसऱ्याच्या मुहूर्तावर आज जगातील सर्वात शक्तिशाली लढाऊ विमानांपैकी एक असलेलं राफेल लढाऊ विमान भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात दाखल झालं. फ्रान्समधील बोर्डोक्स येथील हवाईतळावर हवाईदलप्रमुख राफेल हस्तांतरणाचा सोहळा पार पडला. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या विमानाची पूजा केली. अधिकृतरित्या हे विमान भारताच्या ताफ्यात देण्यात आलं. यावेळी विमानावर ओम काढून, विमानावर नारळ ठेवून राजनाथ सिंह यांनी पूजा केली. राफेलच्या चाकाखाली दोनं लिंबंही ठेवण्यात आली होती.
बार्डोक्स हवाईतळावर राफेल निर्मिती कंपनी दसॉल्ट एव्हिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रॅपियर यांनी राजनाथ यांचं स्वागत केलं. त्यानंतर राफेल लढाऊ विमानाच्या हस्तांतरणाची औपचारिकता पार पडली. यावेळी बोलताना राजनाथ यांनी भारतासाठी हा ऐतिहासिक दिन असल्याचे सांगितले. आज भारतात सर्वत्र विजयादशमी साजरी होत आहे. अपप्रवृत्तींचा विनाश करून सत्प्रवृत्तीचा विजयोत्सव साजरा करण्याचा हा दिवस आहे. योगायोग म्हणजेच आजच वायुसेना दिनही आहे. अशा या शुभदिनी राफेल भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात येत असून हवाईदल यामुळे अधिक शक्तिशाली होणार आहे, असा विश्वास राजनाथ यांनी व्यक्त केला. भारत आणि फ्रान्समध्ये २३ सप्टेंबर २०१६ रोजी राफेल करार झाला होता. त्यानंतर आता योग्यवेळी राफेल भारताच्या ताब्यात येत आहे, असे नमूद करताना भविष्यात हवाईदलाची क्षमता आणखी वाढवण्यावर आमचा भर राहणार आहे, असे राजनाथ म्हणाले.
राफेल विमानात हे सहा बदल होणार
इस्रायली हेल्मेटट माऊंटेड डिस्प्ले
रडार वॉर्निंग रिसिव्हर्स
लो बॅण्ड जॅमर्स
10 तासांचा फ्लाईट डेटा रेकॉर्डिंग सिस्टम
इन्फ्रा-रेड सर्च
ट्रॅकिंग सिस्टम
राफेल विमानाची वैशिष्ट्ये :
1. राफेलला प्रत्येत मोहिमेवर पाठवता येऊ शकते.
2. 60 हजार फुटांपर्यंत हे विमान उड्डाण करू शकतं. तसंच याची इंधन क्षमता 17 हजार किलो आहे.
हे विमान एका मिनिटात 60 हजार फूट उंचीपर्यंत जाऊ शकतं. याची इंधन क्षमता 17 हजार किलो आहे.
3. मल्टिरोल फायटर एअरक्राफ्ट म्हणूनही हे विमान ओळखलं जातं. तसंच वेगवेगळ्या हवामानात हे विमान काम करू शकतं.
4. यामध्ये स्काल्प मिसाईल आहे, जे हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे.
5. राफेलची मारक क्षमता 3 हजार 700 किलोमीटरपर्यंत आहे, तर स्काल्पची रेंज 300 किलोमीटर आहे.
6. राफेल विमानाचा वेग 2,223 किलोमीटर प्रति तास आहे.
7. हे अँटी शिप हल्ल्यापासून अणुबॉम्ब हल्ल्यापर्यंत, क्लोज एअर सपोर्ट आणि लेजर डायरेक्ट लॉन्ग रेंज मिसाईल अॅटॅकमध्येही अव्वल आहे.
8. राफेल विमान 24 हजार 500 किलोपर्यंत वजन घेऊन जाऊ शकतं आणि 60 तासांचं अतिरिक्त उड्डाणही करु शकतं.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |