RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

मिस्टर रामराजे, तुम्ही फलटणकरांचे चाकर आहात बारामतीकरांचे जोकर नाही!

10 June 2019 at 16:38

नगरसेवक अनुप शहांचा वि.प. चे सभापती मिस्टर रामराजेंना सवाल

फलटण  : निरा-देवधर चा पाणीप्रश्‍न पेटलेला असताना बारामतीकरांच्या तुकड्यावर जगणारे आणि स्वत:ला भगिरथ समजणारे विधान परिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक निंबाळकर ज्या फलटणकरांच्या जिवावर राजकारण करतात, त्याच फलटणकरांना आज वार्‍यावर सोडून शेपटी घालून गप्प बसलेले आहेत. त्यामुळे मिस्टर रामराजे तुम्ही फलटणकरांचे चाकर आहात बारामतीकरांचे जोकर नाही, याचे भान ठेवा, असा जळजळीत आरोप फलटण नगरपालिकेचे नगरसेवक अनुप शहा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

विधान परिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांनी स्वत:चे पद वाचविण्यासाठी फलटणकरांचे हक्काचे पाणी बारामतीला विकून फलटणकरांच्या विश्‍वासाला तडा देण्याचे काम केले आहे. गेली अनेक वर्षे रामराजेंनी फलटण तालुक्यात व जिल्ह्यात राजकारण केले. परंतू गेली दोन दशके रामराजेंनी फलटणकरांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप केले आहे. स्वत:ला भगिरथ ही उपाधी चिटकवून त्या खर्‍या भगिरथाचीही खर्‍या अर्थाने विटंबना केली आहे. फलटणमध्ये घराघरात भांडणे लावून यांनी राजकारण केले. गुंडपूंड आणि अवैध खासगी सावकारांना ताकद देवून त्यांना गब्बर केले. धोम-बलकवडीमध्ये वारेमाप 'घबाड' खाल्ले. तरीही यांना नियोजित वेळेत धोम-बलकवडीचे काम करता आले नाही. गेली अनेक वर्षे आदर्कीच्या माळावर पाणी सोडून यांनी मतांची भीक मागितली. परंतू फलटण तालुक्यातील जनता आता हुशार झाली आहे. रामराजेंच्या क्लृप्त्या, कुलंगड्या आता लोकांच्या लक्षात आल्या आहेत. निरा-देवधरचे फलटणच्या वाट्याचे पाणी शरद पवारांच्या आदेशानुसार रामराजेंनी बारामतीला वळवले. स्वत:च्या घरातील लोक भाकरीच्या तुकड्यासाठी मोताद असताना यांनी बारामतीकरांना खीर-बासुंदी खावू घातली व त्या बदल्यात स्वत:च्या पदरात पदांची भीक पाडून घेतली. 

सध्या माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर निरा-देवधरचे हक्काचे पाणी फलटण, माळशिरस तालुक्यांना मिळावे यासाठी जिवाचे रान करीत आहेत. असे असताना रामराजे मात्र आपले पद वाचविण्यासाठी शेपटी घालून बिळात लपले आहेत. मात्र, रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनी बारामतीकरांना चितपट करुन फलटण, माळशिरसच्या हक्काचे पाणी मिळवलेले आहे. त्यामुळे फलटणकरांना ओरिजनल नाईक-निंबाळकर कोण आहे, हे कळून चुकले आहे. शेवटी जनाची नाहीतर मनाची लाज बाळगून सभापती मिस्टर रामराजेंनी फलटणकरांच्या बाजूने उभे राहावे, असा सल्लाही अनुप शहा यांनी प्रसिद्धी पत्रकात दिला आहे. मिस्टर रामराजे तुम्ही फलटणचे अधिपती असल्याचे भान ठेवावे, नाहीतर तुमचीही अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. गेली दोन दशके फलटणकर जनतेने तुम्हाला निवडून दिले, तुमच्यावर प्रेम केले त्यामुळे तुम्ही फलटणकरांचे चाकरच आहात, तुम्ही बारामतीकरांचे जोकर बनण्यापेक्षा फलटणच्या राजकारणातून संन्यास घ्या, असा सणसणीत टोला नगरसेवक शहा यांनी शेवटी प्रसिद्धी पत्रकात लगावला आहे.
Chor ram raje
पाणी कोणी नेहल कोणामुळे गेलं येचे मधी मोहिते पाटील यांचा ही हात आहे


धोम व कण्हेर धरणग्रस्तांचा आता थेट जलाशयात साखळी आंदोलनाचा इशारा

धोम व कण्हेर धरणासाठी शेकडो शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या पण, पुनर्वसनासाठी त्यांना आजही संघर्ष करावा लागत आहे. त्याचाच भाग म्हणून थेट धोम जलाशयात उतरून आंदोलन करण्याचा इशारा जनजागर प्रतिष्ठानचे जिल्हा समन्यवक देवराज देशमुख व श्रीहरी गोळे यांच्यासह

9 hours before

शाहूनगरमधील घुले बंधूंमुळे वाचले भेकराचे प्राण

अजिंक्यतारा किल्ल्यालगतच्या जंगलातून एक भेकर शाहूनगर परिसरात आले होते. त्याच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चवल्याने ते गंभीर जखमी झाले. या भेकराला शाहूनगर येथे राहणार्‍या संतोष घुले आणि प्रकाश घुले या दोघांनी कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले आणि त्याचे

9 hours before

मर्सिडीज-बेन्झतर्फे द्वितीय आणि तृतीय श्रेणी बाजारपेठांवर सातत्याने भर

मर्सिडिज-बेन्झ या भारतातील सर्वात मोठ्या लक्झ्युरी कार उत्पादक कंपनीने महाराष्ट्रातील आपले विश्वासार्ह भागीदार बी.यू. भंडारी मोटर्स यांच्या साह्याने आपल्या मसर्विस ऑन व्हील्सफ या नाविन्यपूर्ण ग्राहक सेवेच्या दुसर्‍या टप्प्याचा शुभारंभ केला.

10 hours before

राज्य सरकारच्या माध्यमातून उत्तर माण, टेंभूचा प्रश्न मार्गी लागेल

टेंभुच्या पाण्याचा बुडबुडाही माणपर्यंत येऊ शकणार नाही म्हणणा-यांना आम्ही टेंभूचे पाणी माण तालुक्यात आणून दाखवले आहे. आता उत्तर माणला जिहे - कटापूर योजनेतून आंधळी धरणातून पाणी उचलून देणे आणि टेंभू योजनेतील उर्वरित गावांना पाणी मिळण्यासाठी

10 hours before