पाटण : करपेवाडीतून तळमावलेकडे जाणार्या पाणंद रस्त्यावरील शेतात करपेवाडी (ता. पाटण) येथील अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. हत्या झालेली विद्यार्थिनी मूळची कराड तालुक्यातील कार्वे गावची रहिवासी आहे. या घटनेचे निश्चित कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नसले तरी याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध ढेबेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
भाग्यश्री संतोष माने (वय 17) ही विद्यार्थिनी तळमावले येथील काकासाहेब चव्हाण महाविद्यालयात इयत्ता बारावीत कला शाखेत शिक्षण घेत होती. माने कुटुंबीय मूळचे कार्वे गावचे रहिवासी असून संतोष माने हे सेट्रिंग कामानिमित्त करपेवाडीत गेल्या काही वर्षांपासून स्थायिक झाले आहेत.
भाग्यश्री माने करपेवाडीतून सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावर असणार्या तळमावलेतील काकासाहेब चव्हाण महाविद्यालयात पायी चालत जात असे. मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास ती महाविद्यालयात जाण्यासाठी नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास ती घरी परतत होती. मात्र मंगळवारी दुपारपर्यंत ती घरी परतली नाही. त्यामुळे वडील संतोष माने यांच्यासह त्यांची पत्नी व भाग्यश्रीची आजी या तिघांनी भाग्यश्रीचा शोध सुरू केला.
करपेवाडीतून तळमावलेकडे जाणारा मुख्य रस्ता तसेच पाणंद रस्ता परिसरात शोध घेतला असता दुपारी साडेतीनच्या सुमारास पाणंद रस्त्यालगत असणार्या देसाई शेत शिवारातील संभाजी साळुंखे यांच्या उसाच्या शेतात भाग्यश्रीचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आढळून आला.
त्यानंतर या घटनेची माहिती ढेबेवाडी पोलिसांना देण्यात आली. दरम्यानच्या कालावधीत परिसरातील लोकांनीही मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यानंतर कायदेशीर सोपस्कर पूर्ण करत मृतदेह शवविच्छेदनासाठी कराडच्या सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी सांगितले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |