कराड : आई ही कधीच निवृत्त होत नसते. परंतु शोभा महादेव साळी आपल्या आरोग्य सेवेतून निवृत्त होताना पाहून त्यांचा मागील प्रवास थक्क करणारा आहे. त्यांनी अत्यंत कष्टातून आपली दोन्ही मुले उच्च पदस्थ बनवली. या आईचा आदर्श समाजाने घ्यावा. त्याचबरोबर प्रत्येकाने आपली मुले घडविताना अतिउत्कृष्ठतेचा ध्यास ठेवावा. तरच उचित ध्येय गाठता येईल, असे मत कोल्हापूरचे पोलिस उप अधीक्षक जितेंद्र जाधव यांनी व्यक्त केले.
रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका शोभा महादेव साळी यांचा सेवानिवृत्ती समारंभ व त्यांचे सुपुत्र विक्रम साळी यांची नागपूर येथे पोलीस उप आयुक्तपदी पदोन्नती झाली. याबद्दल आयोजित केलेल्या सयुंक्त सत्कार समारंभात ते बोलत होते. सौ. साळी यांचा सत्कार समारंभ अत्यंत हृदयस्पर्शी झाला. या कार्यक्रमाने उपस्थित ग्रामस्थांची मने अक्षरक्षः हेलावून गेली. त्याचबरोबर साळी व कुंडल येथील कनुंजे कुटूंबियांना सोहळ्याने भावूक केले. कार्यक्रमास पलूस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहूल रोकडे, जयसिंगपूरचे पोलीस उप अधीक्षक किशोर काळे, कोल्हापूरच्या तहसीलदार रंजना बिचकर, भंडार्याचे पोलीस उपनिरीक्षक रविंद्र बोरकर, अंकुश दिक्षीत, कृष्णेचे संचालक जितेंद्र पाटील, माजी संचालक ब्रम्हानंद पाटील, कराडचे उद्योजक दिपक अरबुणे, क्रांती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सुखदेव कनुंजे, ध्रुवकुमार कनुंजे, जिल्हा परिषदेच्या सदस्या शामबाला घोडके, वैधकीय अधिकारी डॉ. अनिता कदम यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
जाधव म्हणाले, रेठर्याच्या मातीमध्ये जादू आहे. त्या जादूची चुणूक साळी कुटूंबात जाणवते. अत्यंत बिकट परिस्थितीत शोभा साळींचे विक्रम आणि डॉ. विक्रांत हे सुपुत्र यशाचे शिखरे चढले आहेत. विक्रमची नागपूरला पोलिस उपआयुक्तपदी पदोन्नती झाली. तर विक्रांत महाबळेश्वर येथील गहू संशोधन केंद्रात संशोधन अधिकारी म्हणून उत्कृष्ठ काम करत आहे. या दोघांनीही आपल्या मूळ परिस्थितीचे अद्याप भान राखले आहे.
सौ.साळी व विक्रम साळी यांनी सत्कारास उत्तरे दिली. यावेळी प्रगती जाधव, सुरेखा मोहिते, सुधीर बानुगडे, ब्रम्हानंद पाटील, डॉ. सव्वाशे यांची भाषणे झाली. म्हाडाचे संचालक पैलवान आनंदराव मोहिते यांनी प्रास्ताविक केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.विक्रांत साळी यांनी आभार मानले.
यावेळी सरपंच सुवर्णा कापूरकर, उपसरपंच शिवाजीराव दमामे, माजी सरपंच बबनराव दमामे, प्रविणा हिवरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजकुमार पवार, पंचायत समितीचे माजी सदस्य संजय पवार, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब मोहिते, विकास सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष उत्तमराव मोहिते, हेमंत मोहिते यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |