सातारा : बनावट मोबाईल विक्री करुन फसवणूक केल्याप्रकरणी सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने कन्हैयालाल देविदास बेलदार (वय 24, रा.एरंडोल जि.जळगाव) याला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे. दरम्यान, या पाठीमागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 5 ऑक्टोबर 2017 रोजी सातार्यातील प्रशांत जगदाळे यांनी संशयिताकडून मोबाईल खरेदी केला होता. संशयित तक्रारदारांकडे गेल्यानंतर त्याने आपण सातारा फिरायला आल्यानंतर मित्रांनी मध्येच सोडले असून जळगावला जाण्यासाठी पैसे नाहीत. हा माझा 20 हजार रुपये किंमतीचा मोबाईल तुम्हाला 8500 रुपयांना देतो, असे खोटे सांगितले. तक्रारदार यांनी मोबाईल पाहिल्यानंतर तो त्यांनी विकत घेतला.
एक महिन्यानंतर मात्र मोबाईल बंद पडू लागला. तक्रारदार प्रशांत जगदाळे हे मोबाईल शॉपीमध्ये मोबाईल घेवून गेल्यानंतर तो मोबाईल बनावट असल्याचे समोर आल्याने त्यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. हा गुन्हा सातारा सायबर क्राईमकडे तपासाला आल्यानंतर बनावट मोबाईल पाहून पोलिसही चक्रावून गेले. पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर अखेर मूळ मोबाईल विक्री करणारा कन्हैयालाल बेलदार याला पोलिसांनी अटक केली. बुधवारी त्याला सातारा न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशांनी एक दिवसाची पोलिस कोठडी दिली.
पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, पोनि पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गजानन कदम, पोलिस हवालदार सचिन पवार, अमित झेंडे, अजय जाधव, विक्रांत फडतरे, वर्षा खोचे, रेश्मा चव्हाण, सुशांत कदम, प्रवीण अहिरे, मयुर देशमुख, अनिकेत जाधव, निखिल जाधव, ज्योती कोंडावळे यांनी कारवाईत सहभाग घेतला. पोलिस हवालदार दिपक कांबळे पुढील तपास करत आहेत.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |