- अजित जगताप
सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणूचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाने हजाराची संख्या ओलांडली आहे, तर सातार्यात कोरोनाने षटकार ठोकला आहे. अशावेळी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य, पोलीस, जिल्हा प्रशासन युद्ध पातळीवर काळजी घेत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता मोकाट फिरणार्या लोकांना निर्बंध घालण्यासाठी अशा लोकांना डिझेल व पेट्रोल पंप मालक-चालकांनी देवू नयेत, असा आदेश काढण्यात आला. दोन दिवसांपासून पोलीस यंत्रणाही सक्रिय झाल्यामुळे अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली पेट्रोल मागणारे ‘तोतया’ गायब झाले आहेत.
याबाबत माहिती अशी की, प्रसारमाध्यमे व सोशल मीडियावर लॉक डाऊनच्या कालावधीमध्ये जिल्हा प्रशासनाने पोलीस यंत्रणेच्या सहकार्याने पूर्णपणे जिल्ह्याची नाकाबंदी केली. तरीही अत्यावश्यक सेवा यातून वगळून लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी काही शर्ती व अटींवर किराणा दुकाने, मेडिकल, दवाखाने, प्रसारमाध्यमे, शासकीय-निमशासकीय कार्यालयातील कर्मचार्यांची 5 टक्के उपस्थिती असावी, असे गृहित धरले होते. सामाजिक अंतर ठेवून खरेदी-विक्री करण्याचीही सूचना करण्यात आली होती. याचाच गैरफायदा घेवून जे अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट नाहीत, किंबहुना ज्यांचे वृत्त अथवा वृत्तवाहिनीवरील चित्रीकरण प्रसिद्ध होत नाही, असेही काही महाभाग पेट्रोल पंपावर या कालावधीत गर्दी करीत होते. त्यामुळे सातारा जिल्हा पोलिसांनी दोन दिवसांपासून कडक धोरण अवलंबल्यामुळे अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली पेट्रोल मागणारे, चारचाकी-दुचाकी वाहनधारक सध्या तरी गायब झाले असून अशा तोतयांच्या छबी पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या असून भविष्यात या सीसीटीव्हीचा उपयोग गुन्हा दाखल करण्यासाठी होवू शकतो. त्यामुळे आतापासूनच अनावश्यक फिरणार्यांनी आपल्या वाहनात डिझेल पेट्रोल भरण्याचा आग्रह करु नये, अशी सूचना करण्यात येत आहे. प्रसारमाध्यमांनी लॉक डाऊनच्या काळात वृत्तपत्र व प्रसारमाध्यमांशी संबंधित नसणारे यांना आळा घालण्यासाठी आता बातम्या दाखवणारे अथवा देणार्या प्रतिनिधीला खास पत्र देवून पुरवठा विभागाला सहकार्य करावे. कारण प्रेस च्या नावाने स्वत:चे खाजगी व्यवसाय करणारे काही महाभाग कोणतीही बातमी न देता आपल्या वाहनात डिझेल-पेट्रोल घेत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. शासकीय कार्यालयात पाच टक्के कर्मचार्यांची उपस्थिती असावी, असा आदेश असूनही उर्वरित 95 टक्के कर्मचारी आपल्या ओळखपत्राचा गैरफायदा घेवून वाहनात पेट्रोल-डिझेल भरीत आहेत. याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.
काल दि. 7 रोजी सायंकाळी सातारा शहरानजिकच्या भूविकास बँकेशेजारील पेट्रोल पंपावर ओळखीच्या लोकांना डिझेल पेट्रोल देत असल्याची तक्रार पोलीस यंत्रणेला मिळताच त्यांनी त्याची पडताळणी करुन गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत पेट्रोलपंप चालक संघटनेने अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांनी त्यांची भूमिका जाहीर करणे गरजेचे आहे. दोनच दिवसांत सुमारे शंभर बॅरल पेट्रोल तसेच डिझेल विक्री थांबली आहे. याचा अर्थ तोतया मंडळींनी अत्यावश्यक सेवेच्या नावाने पेट्रोल-डिझेल घेतल्याचे स्पष्ट होत आहे. यावर निर्बंध घातले नसते तर या तोतयांनी पीपीआय किटसुद्धा लंपास केले असते, अशी भीती आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |