RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

साताऱ्यात मीच जिंकणार' आणि शरद पवारही पंतप्रधान होणार : खा. उदयनराजे

11 March 2019 at 19:26

पुणे : आपल्या बेधडक स्वभावामुळे प्रसिद्ध असणारे सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा बेधडक वक्तव्य करीत, 'येत्या लोकसभा निवडणुकीत देशात काय होईल मला माहीत नाही, पण साताऱ्यात मीच जिंकणार,' तसेच शरद पवारही पंतप्रधान होणार असा विश्वास बोलून दाखवला आहे. 

आज  शरद पवारांनी माढा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला खा. उदयनराजे भोसले यांनीही उपस्थिती लावली होती. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा बेधडक असे उत्तर देत' देशात काँग्रेसप्रणित आघाडीच्या सरकारला सत्ता स्थापन करण्याची संधी मिळालीच तर 'पवारसाहेब राजकारणात सध्या सर्वात वरिष्ठ आहेत. त्यांना संधी मिळायला हवी,' असं उदयनराजे म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तुमचे चांगले संबंध आहेत, असं विचारताच, 'नुसते चांगले नाही. खास संबंध आहेत. का नसावेत? माझे अनेक पक्षांत मित्र आहेत,' असं उदयनराजे म्हणाले. तसेच साताऱ्यात कोणीही कितीही नसत्या उठाठेव्या केल्या तरी साताऱ्यात मीच जिंकणार' असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

Gulam Muhammad A S Khan

महाराष्ट्रातील जनतेने खा. उदयनराजे भोसले यांना , कोणत्याही मतदार संघातून बिनविरोध, निवडून द्यायला हवे...!!


Gulam Muhammad A S Khan

महाराष्ट्रातील जनतेने खा. उदयनराजे भोसले यांना , कोणत्याही मतदार संघातून बिनविरोध, निवडून द्यायला हवे...!!महाआघाडीतल्या ५६ पक्षांच्या पराभवासाठी महायुतीचे पाच पांडव पुरेसे : मुख्यमंत्री

महाराष्ट्रात बोलघेवडे लोक खूप आहेत त्यातच हल्ली बारामतीचा पोपट खूप बोलू लागला आहे आमचे कपडे कोणीच काढू शकणार नाही पण तुमच्या अंगावर आता काही शिल्लकच राहिले नाही

15 hours before

धक्कादायक ! पत्नीवर गोळ्या झाडून मंत्रालयातील सहसचिवाची आत्महत्या

मंत्रालयीन सहसचिवाने आपल्या पत्नीवर गोळीबार करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंत्रालयात सहसचिव पदावर कार्यरत असलेल्या विजय पवार यांनी घरगुती वादातून गुरुवारी रात्री पत्नीवर २ गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या

22 March 2019 at 16:05