मुंबई : दिवाळी आणि सुट्ट्यांच्या हंगामात रेल्वेपाठोपाठ एसटीदेखील फुल्ल होऊ लागल्याने प्रवाशांना खासगी बस तसेच लग्झरी सेवेचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र या खासगी बससेवेचे दर दिवाळीचा मुहूर्त साधून अव्वाच्या सव्वा वाढवण्यात आले आहेत. मुंबई ते गोवा, औरंगाबाद, कोल्हापूर आदी सर्वच मार्गांवर खासगी बससेवांचे भाडे दीडपट ते दुप्पट वाढवण्यात आले आहेत.
सण, सुट्ट्यांच्या हंगामात खासगी बसचालकांकडून जादा दर आकारले जाण्याची तक्रार कायम असते. ती कमी म्हणून की काय, एसटीने गतवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीत १० टक्के भाडेवाढ केली आहे. मात्र लांब पल्ल्याच्या एसटी गाड्यांचे आरक्षित तिकीट मिळत नसल्याने प्रवाशांना खासगी बससेवेकडे वळावे लागत आहे. खासगी बससेवांना तात्पुरत्या कालावधीसाठी एसटीच्या तिकिटांपेक्षा दीडपट अधिक भाडे आकारण्यास मुभा आहे. मात्र सर्वच मार्गावर हंगाम नसतानाच्या कालावधीत आकारले जाणाऱ्या तिकिटाच्या तुलनेत सध्याचे भाडे दुप्पटीवर पोहोचले आहे. पुढील काही दिवस प्रवाशांना अशाच जादा दरवाढीस सामोरे जावे लागणार आहे.
लग्झरी बस
मार्ग -आधी -आता
मुंबई ते गोवा -६०० रु. -१००० रु. (नॉन एसी)
मुंबई ते गोवा -८०० रु. -२००० ते २१०० रु. (एसी)
मुंबई ते नागपूर -१००० ते १२०० रु. -१८०० ते २२२० रु. (एसी स्लीपर)
मुंबई ते पुणे -४५० रु. -४५० रु.
मुंबई ते औरंगाबाद -७०० ते ८०० रु. -१२०० रु. (एसी स्लीपर)
मुंबई ते औरंगाबाद -४०० रु. - ६०० रु.(आसनी)
मुंबई ते कोल्हापूर -७०० रु. -१,००० रु.
मुंबई ते रत्नागिरी -४०० रु. - ६०० रु. (नॉन एसी)
एसटी भाडेवाढ (दिवाळी काळात)
मार्ग-आधी- आता
मुंबई-अलिबाग
सेमी लग्झरी पूर्वी भाडे १८१ रु. -२०० रु.
मुंबई-कोल्हापूर
शिवशाही-६९६ रु. -७६५ रु.
मुंबई-सातारा
शिवशाही ४७५ रु. -५२२ रु.
मुंबई-औरंगाबाद
शिवशाही-५६३ रु. -६२१ रु.
मुंबई-चिपळूण
४५५ रु. -५०० रु.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |