कराड : पतसंस्थांसमोरील प्रश्नांना संघटीतपणे वाचा फोडण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील नागरी, पगारदार, बिगरशेती, महिला पतसंस्थांचे महाअधिवेशन व प्रशिक्षण दि. १ व २ ऑक्टोबर रोजी पंढरपूर येथील शनैश्वर मठ येथे आयोजीत करण्यात आले असल्याची माहिती सहकार भारतीचे पश्चिम महाराष्ट्र महामंत्री संजय परमणे यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजीत पत्रकार परिषदेत ते आज (सोमवारी) बोलत होते. यावेळी श्रीकांत केळकर, विजय पाटील, मुकुंद चरेगांवकर यांची उपस्थिती होती.
ते पुढे म्हणाले, सहकार भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत व सहकार भारतीय सहकार प्रशिक्षण सहकारी संस्था कराड यांच्या संयुक्त विद्यमाने पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी संस्थांचे हे महाअधिवेशन व प्रशिक्षण भरविण्यात आले आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन महसुलमंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते व सहकार मंत्री ना. सुभाष देशमुख, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना. डॉ.अतुल भोसले यंाच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या अधिवेशनात पतसंस्थासाठी व्यवसायाच्या नवनवीन कल्पना, जीएसटी कायदा, आयकर कायदा, नियमक मंडळ, वसुली तंत्र व मंत्र व्यवस्थापन, पतसंस्था समस्या व उपाय, पतसंस्था व तंत्रज्ञान या विषयावर चर्चासत्र होणार आहे. या चर्चासत्रात ना. शेखर चरेगांवकर, डॉ. उदय जोशी, अजय निकुंब,सीए श्रीराम देशपांडे, नितीन वाणी, विद्याधर अनास्कर हे सहभागी होणार आहेेत. नुकतेच सरकारने पतसंस्थाकडील १ लाखापर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण देण्याचे जाहीर केले आहे. या महाअधिवेशनामध्ये पतसंस्थासमोरील अशा अनेक प्रश्नांना वाचा फोडून त्या मागण्या शासनाकडून मान्य करून घेण्याचा ठराव करण्यात येणार आहे. या महाअधिवेशनासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पूणे, अहमदनगर या जिल्हयातून सुमारे दोन हजार संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात नामवंत संस्थांना पुरस्कार देण्यात येणार असल्याचे संजय परमणे यांनी सांगितले,
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |