10:07pm | Jun 20, 2018 |
सातारा : पोलीस असल्याचा बनाव करुन पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील गोटे, ता. कराड येथे विजापूर येथील साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना व निवृत्त डीवायएसपींना बेदम मारहाण करुन 4.30 कोटी रकमेवर डल्ला मारुन पळून जाण्याच्या बेतात असतानाच सातारा पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोकणातून मुंबईच्या दिशेने पळून जाण्याच्या बेतात असतानाच रत्नागिरी पोलिसांनी जागोजागी चेक पॉईंट लावून आरोपींना संगमेश्वर येथे पाठलाग करुन केवळ चारच तासात जेरबंद केले. दरम्यान, रत्नागिरी पोलिसांनी या संशयित आरोपींना सातारा पोलिसांच्या ताब्यात दिले. संबंधित आरोपींना पोलीसी हिसका दाखवताच वाटमारी करणार्या टोळीतील ठाणे येथील फायनान्स करणार्या कंपनीच्याच व्यक्तिंचा हात असल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यात चौघांना अटक करण्यात आली असून अन्य चौघे पसार आहेत, इतर आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी सांगितली.
विजापूर, कर्नाटक येथील ज्ञानयोगी स्वामी शिवकुमार शुगर या साखर कारखान्याचा करार करण्यासाठी कारखान्याचे कार्यकारी संचालक निवृत्त डीवायएसपींसह कराडमध्ये आले होते. दरम्यान, गोटे ता. कराड येथे संबंधित साखर कारखान्याच्या संचालकांची गाडी अडवून दोन वाहनांतून आलेल्या आठ दरोडेखोरांनी संचालक मंडळासह निवृत्त डीवायएसपींना बेदम मारहाण करीत त्यांच्या जवळ असलेली 4.30 कोटींची रक्कम घेवून रत्नागिरीच्या दिशेने पोबारा केला होता. या घटनेची माहिती सातारा पोलिसांना समजताच जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी अतिशय वेगाने सूत्रे हलवून याबाबतची कल्पना रत्नागिरी पोलिसांना दिली होती. दिलेल्या सूचनेनुसार रत्नागिरी पोलिसांनी कराड-चिपळूण मार्गावर ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती. घटनेची गांभीर्यता ओळखून रत्नागिरीचे पोलीस प्रमुख प्रणय अशोक, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, चिपळूण पोलीस ठाण्याचे इंद्रजित काटकर, संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोनि महेश थिटे, पोलीस उप अधीक्षक गणेश इंगळे यांनी सावर्डे, देवरुख, साखरपा येथे नाकाबंदी केली होती. परंतू आरोपींनी सावर्डे येथील नाकाबंदी तोडली होती. परंतू संगमेश्वर येथे पोलिसांनी आरोपींची गाडी पाठलाग करुन पकडली. यावेळी गजानन महादेव तदडीकर (वय 45, रा. रमेशवाडी, मानवपाग, बदलापूर प.), विकासकुमार संगमलाल मिश्रा (वय 30 रा. लल्लुसिंग चाळ, दुर्गानगर मुंबई), महेश कृष्णा भंडारकर (वय 53, रा. विजय गॅलेक्सी टॉवर, ठाणे प.), दिलीप नामदेव म्हात्रे (वय 49 रा. रॉयल अपार्टमेंट, कळवा, ठाणे) यांना काल सायंकाळी रत्नागिरी पोलिसांनी अटक केली होती. यानंतर कराड शहर पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा या टोळीला ताब्यात घेतले होते. संबंधितांना पोलीसी हिसका दाखवताच त्यांनी याबाबतची सविस्तर माहिती पोलिसांना दिली.
मुंबईतील ज्या किंग्ज फायनान्सने याबाबत साखर कारखान्याला फायनान्स केला होता, त्याच फायनान्स कंपनीचा या दरोड्यात हात असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे. कारखान्या सोबतच्या करारासाठी मुंबईच्या किंग्ज फायनान्स कंपनीचा प्रमुख दिलीप म्हात्रे हासुद्धा कराडमध्ये आला होता. कारखाना पदाधिकार्यांशी त्याने याबाबत चर्चाही केली होती. चर्चा करीत असतानाच कारखान्याच्या संचालकांना दिलेल्या रकमेवर दरोडा पडला होता. यावेळी दिलीप म्हात्रे याने घाबरल्याचा बनावही केला होता. मात्र या सर्व प्रकरणात तोच मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे. सुमारे तीन महिन्यांपासून कारखान्याच्या करारासाठी वाटाघाटी सुरु होत्या. त्या वाटाघाटी दरम्यानच म्हात्रेने दरोड्याचा कट रचला होता. यासाठी त्याने मुंबईतील सराईतांची टोळी बनवली होती. मंगळवारी कारखान्याच्या संचालकांसोबत कराराच्या वाटाघाटी होणार असल्याने तसेच आर्थिक देवाणही होणार असल्याने त्याने सोमवारी सकाळपासून मुंबईमधून फिल्डिंग लावली होती. याबाबत कोणी काय भूमिका घ्यायची, याबाबतची रंगीत तालिमही घेण्यात आली होती. ठरल्यानुसार दरोडाही घालण्यात आला. मात्र, सातारा पोलिसांच्या सतर्कतेमुळे या दरोड्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे. मात्र, फिल्मीस्टाईल दरोड्याचा सातारा व रत्नागिरी पोलिसांनी अवघ्या चार तासातच पर्दाफाश केला. जिल्ह्याच्या इतिहासातील हा सर्वाधिक रकमेचा दरोडा सातारा पोलिसांच्या कार्यकालातील माईलस्टोन ठरला आहे. सातारा पोलिसांच्या या कार्यतत्परतेचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे. दरम्यान, जप्त केलेली रक्कम आयकर विभागाकडे तपासासाठी वर्ग करण्यात येणार आहे.
आरोपींना मोक्का लावणार : पोलीस प्रमुख संदीप पाटील
सिरीयल किलर संतोष पोळच्या मुसक्या आवळून जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी पोलीस प्रमुख पदाची सूत्रे हाती घेताच जिल्ह्याला आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली होती. त्यानंतर जिल्हाभरात अनेक किचकट गुन्हे घडले. याचा छडा लावण्यात संदीप पाटील यांच्या टीमला वेळोवेळी यश आलेले आहे. नोटबंदीच्या काळामध्ये नोटांचा काळाबाजार करणार्यांना सातारा पोलिसांनी हिसका दाखवलेला होता. काल पडलेल्या दरोड्याचा अवघ्या चार तासात छडा लावून 4.30 कोटींची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. यातील चार आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले आहे. यातील आरोपींची यादी बरीच मोठी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा (मोक्का) अन्वये कारवाई करणार असल्याचे आज दुपारी कराड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी सांगितले.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |