RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

मराठा आरक्षण : महाराष्ट्र बंदला कराड शहरासह तालुक्यात उत्फूर्त प्रतिसाद

10 August 2018 at 01:42

कोल्हापूर नाका व राष्ट्रीय मार्गावर आंदोलकांनी तब्बल ४ तास वाहतूक रोखली

कराड : राज्यभरात मराठा आंदोलनाचा भडका उडाला असताना 9 ऑगस्टला पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला कराड शहरासह तालुका उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी शांततेत तर अनेक ठिकाणी उग्र आंदोलन करण्यात आले. कराडच्या मुख्य बाजारपेठेसह उपनगरांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यामुळे सर्वत्रर शुकशुकाट होता. सकाळपासून शहरातील सर्व दुकाने, बाजारपेठ, बसस्थानक, हॉटेल पुर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. 

दरम्यान, कोल्हापूर नाका व राष्ट्रीय मार्गावर तब्बल 4 तास वाहतूक आढवून धरली.  काही अफवाद वगळता रास्तारोको यशस्वी झाला. यावेळी पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. 

सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच समाजाच्या इतर मागण्यांची पूर्तता करण्यात यावी यासाठी राज्यभरात मराठा क्रांती मुक मोर्च्या आंदोलन करण्यात आले. या मागण्या पूर्ण करण्याबाबतचे आश्वासन सरकारने पाळले नाही. त्यामुळे सखल मराठा समाजाने ठोक हाती घेतले आहे. यात काही मराठा आंदोलकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. 

 या आंदोलनात काही विध्वंसक प्रवृत्तींनी घुसखोरी करून आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे क्रांतीदिनी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद वेळी विध्वंसक प्रवृत्तींकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मराठा समन्वय समितीकडून कराड येथील महिलांचे सलग गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कोणीही शहरात येऊन पदयात्रा वा दुचाकी रॅली काढून तणावाची परिस्थिती निर्माण करू नये असे आवाहन करण्यात आले. 

मात्र, आक्रमक मराठा युवकांनी त्याकडे दुर्लक्ष करत शहरातून गुरुवारी सकाळी 10 वाजल्यापासूनच दुचाकी रॅली काढण्यास सुरुवात झाली. त्यामध्ये शहर, उपनगरांसह तालुख्यातील ग्रामीण भागातून आलेल्या युवकांनी सरकार विरोधी घोषणाबाजी करीत दुचाकी रॅलीत सहभाग नोंदवला. राष्ट्रीय महामार्गावर संतप्त आंदोलकांनी जमाव करत कोल्हापूर नाक्यावर दोन तास रास्तारोको केला.  तर यामध्ये कोल्हापूर नाका,  कोयना पुलाच्या पुढे वारुंजी, मुंढे, गोटे, वनवासमाची, खोडशी तसेच पाटण मार्गावरील विजयनगर, पाडळी यांच्यासह शहरातील मराठा युवकांनी चक्का जाम केला.

'एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, फडणवीस सरकारचा धिक्कार असो' अशा घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. तब्बल 4 तास चाललेल्या रास्तारोकोत सरकारचे वाभाडे काढण्यात आले. अखेर पोलिसांच्या आवाहनाला आंदोलनकर्त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आंदोलन स्थगित करत वाहतूक खुली केली.

विद्यानगर परिसरातील कृष्णा कॅनॉल येथे आंदोलक युवकांनी बराच वेळ चक्का जाम केला. त्यामुळे ओगलेवाडी, मसूर परिसरात जाणारी वाहतूक खोळंबली. तर विजयनगर येथेही संतप्त जमावाने घोषणाबाजी करत चिपळूण विजापूर राज्य महामार्ग काही काळ रोखून धरला. कराड विमानतळ परिसरात सुमारे दोनशे मराठा बांधव रस्त्यावर उतरले.वाहतूक अडवली. त्यासाठी रस्ते कामातील सिमेंटचे डीव्हायडेटरचा वापर केला, परिसरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. ओगलेवाडी, रेठरे, कार्वे, वाठार, पाचवड, काळे, उंडाळे, तांबवे, उंब्रज,आदी विभागात मराठा समाज रस्त्यावर उतरला.

मराठा समाज बांधवांनी राष्ट्रीय मार्ग रोखला मात्र मार्गावरून जाणाऱ्या रुग्णवाहीका, वृद्ध नागरिकांच्या वाहनांना मार्ग मोकळा करून दिला.

जावली तालुक्यातील अवैद्य दारू विक्रेत्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी

गेली ११ वर्ष जावली तालुक्यात सुरु असलेली १३ दारू दुकाने महिलांनी व व्यसनमुक्ती संघटनांनी ऐतिहासिक पाऊल उचलून बंद केली होती.

4 hours before

एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा

कराड जवळील एका गावात नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

5 hours before

तलावात बुडून युवकाचा मृत्यू

बामणवाडी (ता.कराड) येथे जांभळा नावच्या शिवारात असलेल्या कृषि विभागाच्या पाजर तलावात युवकाचा बुडून मृत्यू झाला.

5 hours before

सातार्‍यातून ट्रॅक्टर, दोन दुचाकी चोरी

सातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकठिकाणाहून ट्रॅक्टर व दोन दुचाकी चोरुन नेला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

5 hours before