कराड : गोळेश्वर ता. कराड येथील कार्वेरोडलगत असलेल्या थोरात हॉस्पिटलजवळील कल्पतरू कॉलनीतील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील एलईडी टीव्ही, किराणा साहित्य व जुने कपडे मिळून २५ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना बुधवार दि. १७ रोजी रात्री घडली.
याबाबत सुनंदा विलास बारटक्के वय ५२ यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. बारटक्के यांचे कल्पतरू कॉलनीमध्ये घर आहे. त्या पती विलास लक्ष्मण बारटक्के यांच्यासमवेत थोरात हॉस्पिटलजवळ एका गाळ्यात चहाची टपरी चालवतात. बुधवारी रात्री कॉलनीतील घराला कुलूप घालून नेहमीप्रमाणे बारटक्के पती-पत्नी त्यांची चहाची टपरी असलेल्या गाळ्यात झोपण्यासाठी गेले. गुरूवारी सकाळी दोघेही पुन्हा घराकडे परतले. त्यावेळी घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरातील एलईडी टीव्ही संच, जून्या सहावारी ३0 साड्या, २ तेलडबे, ३0 किलो तांदूळ, चटणी, खोबरे, डालडा, तूरडाळ, मसाल्याची पाकिटे आदी किराणा साहित्य चोरून नेल्याचे बारटक्के दांम्पत्याच्या निदर्शनास आले. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूध्द शहर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |