सातारा : सध्या सातारा शहरात कोणत्याही विषयात कलगीतुरा सुरु आहे. मग ते प्रशासन असो, राजकारण असो, समाजकारण असो एकमेकांच्या जिरवाजिरवीची एकही संधी सध्या सोडली जात नाही. सातार्यातील ट्रॅफिक हा त्यातलाच एक प्रकार. सातारकरांच्या अनेक विषयांपैकी सातारचे टॅ्रफिक हा जिव्हाळ्याचा विषय. अशीच भन्नाट घटना आज सातार्यात घडली आहे. नो पार्कींगमध्ये असणार्या कारला पोलिसाने जॅमर लावल्यानंतर चक्क त्यावरील चालकाने जॅमरचा टायर काढून स्टेपनी लावून तो जॅमरच चोरी केला असल्याची घटना घडली आहेे. दरम्यान, या घटनेमुळे सातार्यात दंड टाळण्यासाठी टायरसह जॅमरच चोरीला गेला, अशी वेळ वाहतुक विभागातील पोलिसांवर म्हणण्याची आली आहेे.
याबाबत अधिक माहिती अशी, सातार्यातील राधिका रोड येथे भारत गॅस एजन्सी आहे. या परिसरातील काही भाग नो पार्कींग झोन आहेे. असे असतानाही दि. 18 रोजी एम एच 11 एल 9749 ही कार नो पार्कींगमध्ये लावण्यात आली होती. वाहतुक विभागाचे एका पोलिसाने कार नो पार्कींगमध्ये असल्याने त्यांनी या कारला जॅमर लावला. बराच वेळ थांबल्यानंतरही कारचा चालक त्याठिकाणी आला नसल्याने पोलिसांनी नेहमीप्रमाणे त्यांचे काम सुरु ठेवले.
सोमवारी सकाळी जॅमर लावल्यानंतर दिवस संपून ड्युटी संपण्याची वेळ आल्याने वाहतुक विभागाचे पोलिस वाहतुक शाखेत हजेरीसाठी एकत्र आले. यावेळी एक जॅमर नसल्याचे निदर्शना आले. पोलिसांनी राधिका रोडवर धाव घेतली मात्र त्याठिकाणी जॅमर लावलेली कार नसल्याचे लक्षात आले. या घटनेने पोलिसांनाही घाम फुटला. वरिष्ठांना या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनीही शोध घेण्याचे आदेश दिले. मंगळवारीही कार व जॅमरचा शोध लागत नसल्याने अखेर शाहूपुरी पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार राजेंद्र पगडे यांनी याबाबत तक्रार दिली आहे.
दरम्यान, पोलिसांनी लावलेल्या जॅमरचे टायर बदलून दुसरे टायर घालून जॅमरची चोरी झाल्याचे लक्षात आल्याने या घटनेची सातार्यात जोरदार चर्चा रंगली आहे.
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |