05:38pm | May 12, 2018 |
सातारा : सातारा-जावली मतदारसंघातील बलाढ्य उमेदवारा विरोधात भाजप पुर्ण ताकतीने लढले होते. त्यावेळी मतदारांची मोठा प्रतिसाद दिला होता. सातारा-जवलीतील जनता शिवेंद्रसिंहराजेच्या विरोधात जनता मतदान करेल असे नाही. आता सातारची विधान सभेची जागा भाजपला जिकायची आहे. त्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी तळागाळातील जनतेपर्यंत जाऊन प्रश्न सोडवा असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. दरम्यान सातारा-जावली मतदारसंघाचा उमेदवार कोण दीपक पवार की, अन्य कोण हे योग्य वेळी पक्ष जाहिर करेल, असे सूतोवाच पाटील यांनी केले.
सातारा - जावली विधानसभा मतदारसंघाच्या जन संपर्क कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माधव भंडारी, रवींद्र अनासपुरे, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जावळीचे नेते दीपक पवार, मनोज घोरपडे, प्रभाकर साबळे, धनंजय जांभळे, महेश शिंदे, सिद्धी पवार, प्राची शहाणे, विजय कटवटे, अमित कुलकर्णी आदी उपस्थित होते.
चंद्रकांतदादा पुढे म्हणाले, साताऱ्यात जनसंपर्क कार्यालय सुरू करून मते मिळणार नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यात भाजपने गरीब जनतेपर्यंत पोचण्यासाठी सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. तसे उपक्रम साताऱ्यात सुरू केले पाहिजेत तरच जनता भाजपच्या पाठीशी राहील. जनतेच्या प्रश्नासाठी सुरू केलेले जनसंपर्क कार्यालय 24 तास सुरू राहिले पाहिजे. मी येता- जाताना अचानकपणे भेट देईन. त्यावेळी जर जनसंपर्क कार्यालय बंद दिसले तर मग उमेदवारी बाबतीत विचार करावा लागेल असा टोला कोणाचेही नाव न घेता लगावला. सातारा-जावली मतदारसंघाचा उमेदवार कोण दीपक पवार की, अन्य कोण हे योग्य वेळी समजेल. पाटील म्हणाले, संपर्क कार्यालयात जनतेला सुविधा मिळतील याची काळजी घ्या. त्यासाठी लागेल ती मदत केली जाईल, असे सांगून पाटील म्हणाले, सातरची जनता शिवेंद्रसिंहराजे यांच्या विरोधात मतदान करेलच असे नाही. कोल्हापूरच्या धर्तीवर सातारच्या जनसंपर्क कार्यालयात सामाजिक उपक्रम राबवावेत आणि जनतेची कामे करावीत असे चंद्ररकांदादा यानी शेवटी सांगितले.
मागासवर्गीय आयोग सध्या महाराष्ट्र भर फिरून माहिती घेत आहे. त्यांचा अहवाल न्यायालयात सादर झाल्यावर, मराठा आरक्षणासाठी आवश्यक ती कायदेशीर लढाई सरकार ताकतीने लढले, मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी न्यायालयाने केलेल्या सुचनेप्रमाणे सरकारने मागासवर्गीय आयोग नेमला आहे. आयोगाला आवश्यक त्या सोई सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. येत्या काही दिवसात आयोग आपला अहवाल न्यायालयात सादर करेल. त्या नंतर मराठा आरक्षणासाठी आवश्यक ती कायदेशीर लढाई सरकार ताकतीने लढले. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही सरकारची भूमिका आहे, असे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज सातारा मध्ये पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |