महाबळेश्वर : महाबळेश्वर पोलादपुर मार्गावर आंबेनळी घाटात बावली टोक या ठिकाणी एका अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने एक बीएमडब्ल्यु कार 40 ते 50 फुट खोल दरीत कोसळुन अपघात झाला. या अपघातात सुदैवाने वाहन चालक प्रशांत राजेंद्र सोसटे रा. पुणे हा गाडीच्या बाहेर फेकला गेला आणि तेथे असलेल्या एका झाडात अडकुन पडला. त्याला उपचारासाठी पोलादपुर येथील ग्रामिण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे
पुणे येथे राहणारे सोसटे हे पोलादपुर मार्गे महाबळेश्वर येथे येत होते. गाडीत ते एकटेच होते. शनिवारी सकाळी बावली टोक दरम्यान एका अवघड वळणावर त्यांचा गाडीवरील ताबा सुटला व कार क्र एम एच 14 एफ जी 0077 ही खोल दरीत कोसळली. कार कोसळत असताना सुदैवाने गाडीचा दरवाजा उघडला गेला आणि ते गाडीच्या बाहेर फेकले गेले. दरीत असलेल्या झाडीत ते अडकले. त्याच्या मागे असलेल्या गाडीतील लोकांनी त्यांना झाडीत अडकलेले पाहिले. परंतु त्यांना चालकाला बाहेर काढता आले नाही. त्यांनी तातडीने पुढे असलेल्या वाडा कुंभरोशी या गावातील ग्रामस्थांना ही माहीती दिली. ग्रामस्थांनी तातडीने हालचाली करून काही साहित्य घेवुन ते अपघात स्थळी गेले व त्यांनी झाडीत अडकलेल्या चालकाला बाहेर काढले व पुढील उपचारासाठी त्याला पोलादपुद ग्रामिण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलादपुर पोलीस करीत आहेत.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |

राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |