मुखामध्ये निर्माण होणार्या आम्लामुळे दातांचे वरील आवरण किंवा इनॅमल खराब होते, त्यामुळे दात किडतात; पण काही घरगुती उपाय केल्यास दात मजबूत होतातच; परंतु नैसर्गिकरीत्या दात किडण्यावर इलाज केला जाऊ शकतो.
दात किडणे म्हणजे दाताला भोक पडते. त्यालाच दंतक्षय किंवा कॅव्हिटी म्हणतात. तोंडातील आम्लामुळे दातावरील आवरण किंवा इनॅमल कमजोर होते आणि दात किडतात. तोंडात असलेले जीवाणू (लाळ, अन्नकण आणि इतर पदार्थ यांच्याबरोबर) दाताच्या पृष्ठभागावर जमा होतात. त्याला प्लाक असे म्हणतात. त्यातील जीवाणू आहारातील शर्करा आणि कार्बोहायड्रेटचे आम्लात रूपांतर करतात. त्यामुळे दात कमजोर होतात परिणामी दात किडतात. काही घरगुती उपाय केल्यास दात मजबूत होतातच; पण नैसर्गिकरीतीने दात किडण्यावर उपायही करता येतात.
लवंग : दातांचे किडणे तसेच इतर समस्यांसाठी लवंग खूप प्रभावी असते. अँटिइन्फ्लमेटरी, एनाल्जेसिक आणि जीवाणूप्रतिरोधक गुणांमुळे लवंग वेदना कमी करण्यासाठी आणि दात किडण्यावर निर्बंध आणते. समस्या निर्माण झाल्यास एक चतुर्थांश चमचा तिळाचे तेल 2-3 थेंब व लवंग तेलाचे मिश्रण करून घ्या. हे मिश्रण झोपण्यापूर्वी कापसाच्या बोळ्यावर घेऊन किडलेल्या दाताला लावावे.
मीठ : मिठामध्ये असलेले अँटिसेप्टिक आणि अँटिबायोटिक गुणांमुळे दात किडण्याच्या समस्येवर मिठाचा चांगला उपयोग होतो. वेदना आणि सूज कमी करण्यासाठी तसेच कोणत्याही प्रकारचा संसर्ग आणि तोंडातील जीवाणूंच्या वाढीला रोखण्यास मदत करतो. त्यासाठी एक चमचा मीठ घेऊन गरम पाण्यात मिसळावे. या पाण्याने गुळण्या कराव्यात. समस्या दूर होईपर्यंत हा उपाय दिवसातून दोन-तीनवेळा करावा. त्याशिवाय अर्धा चमचा मीठ, थोडे मोहरीचे तेल आणि लिंबाचा रस मिसळून पेस्ट करावी. या पेस्टने काही मिनिटांपर्यंत हिरड्यांना मसाज करावा. जीवाणू नष्ट करण्यासाठी काही दिवस हा उपाय दिवसातून दोनवेळा करावा.
ऑईल पुलिंग : हा खूप जुना उपाय आहे, त्यामुळे दातांमधील कीड कमी होते. त्याचबरोबर हिरड्यांतून रक्त येणे आणि श्वासाला येणारा दुर्गंध दूर करण्यास मदत होते. तसेच दाताच्या समस्यांच्या विविध प्रकारांसाठी जबाबदार हानिकारक जीवाणू तोंडातून काढून टाकण्यासाठी मदत करते. त्यासाठी एक चमचा तिळाचे तेल तोंडात ठेवावे. 20 मिनिटे तेल तोंडातच ठेवावे, मग थुंकून द्यावे; पण हे तेल गिळू नये. त्यानंतर कोमट पाण्याने गुळण्या करून धुवून टाकावे. त्याशिवाय मिठाच्या पाण्याचा वापर करावा. त्यानंतर नेहमीप्रमाणे दात घासावेत. रोज सकाळी अनशापोटी हा उपाय करावा. हा उपाय सूर्यफूल किंवा नारळाचे तेल वापरूनही करता येतो.
लसूण : लसणामध्ये जीवाणूविरोधी गुण असतातच; परंतु अँटिबायोटिक गुणही असतात, त्यामुळे लसूण दात तुटण्याच्या आणि किडण्याच्या समस्या दूर करण्यास मदत करतो. वेदनांपासून मुक्ती देण्यासाठी आणि हिरड्या आणि दातांचे आरोग्य चांगले राहण्यासही मदत करतो. 3-4 लसूण पाकळ्या कुस्करून आणि पाव चमचा सैंधव मीठ मिसळून त्याची पेस्ट करावी, त्यानंतर खराब झालेल्या दातांवर लावून 10 मिनिटे तसेच ठेवा. दातांची कीड कमी करण्यासाठी काही दिवस दिवसातून दोनवेळा हा उपाय करावा.
ज्येष्ठमध : अमेरिकन केमिकल सोसायटीच्या जर्नल ऑफ नॅचरल प्रॉडक्टमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, ज्येष्ठमधाचे मूळ दातांच्या आरोग्यासाठी उत्तम असते. ज्येष्ठमधामध्ये उपलब्ध असलेल्या जीवाणूप्रतिबंधक गुणांमुळे जीवाणूंमुळे दात किडण्याला प्रतिबंध होतो. त्याशिवाय ज्येष्ठमध दातांवरील प्लाक हटवण्यास मदत करते. नियमितपणे ज्येष्ठमधाच्या पावडरने दात घासावेत. त्याशिवाय ब्रश करण्यासाठीही ज्येष्ठमधाची काडी वापरू शकतो.
हळद : आयुर्वेदात हळदीचा वापर दात किडीमुळे होणार्या वेदना कमी करण्यासाठी केला जातो. त्यातील अँटिबॅक्टेरियल गुणांबरोबर अँटिइन्फ्लमेटरी गुणही दाढा आरोग्यपूर्ण राखण्याबरोबरच जीवाणूंच्या संक्रमणामुळे दात पडण्याच्या समस्येलाही प्रतिबंध करतात. प्रभावित दातांवर थोडी हळद पावडर लावून काही मिनिटे तसेच ठेवा. मग कोमट पाण्याने चांगल्या गुळण्या कराव्यात.
कडुनिंब : कडुनिंब दात किडण्याच्या समस्येवरील उपायांपैकी एक उपयुक्त उपाय आहे. त्यातील अँटिबॅक्टेरियल गुण जीवाणूंमुळे दात किडणे दूर करण्यास मदत करतात. त्याशिवाय दात आणि हिरड्या यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठीही मदत करतात. दात आणि हिरड्या यांच्यावर कडुनिंबाच्या पानांचा रस लावावा. काही मिनिटांपर्यंत तसेच राहू द्यावे, त्यानंतर गुळण्या कराव्यात. हा उपाय दिवसातून दोनवेळा करावा. त्याशिवाय कडुनिंबाच्या काडीचा वापर दात घासण्यासाठी ब्रशप्रमाणे करू शकता.
आवळा : आवळा हादेखील दात किडण्याच्या समस्येवर उत्तम उपाय आहे. त्यात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट आणि ‘सी’ जीवनसत्त्वामुळे जीवाणू आणि संसर्गाशी लढण्यास मदत करते. दाताच्या जोडणार्या उतींच्या विकासाला प्रोत्साहन देत असल्याने हिरड्यांसाठी आवळा फायदेशीर आहे. त्याशिवाय तोंड स्वच्छ करणे, श्वासाचा दुर्गंध यापासून सुटका मिळवण्यासाठीही मदत करतात. नियमितपणे ताजा आवळा खावा. अर्धा चमचा आवळ्याची पावडर अर्धा ग्लास पाण्यासमवेत नियमितपणे घ्यावी.
छत्रपती शिवाजी कॉलेजची एन सी सी कॅडेट गार्गी थल सैनिक कँपसाठी दिल्लीला रवाना |
भा ज पा सातारा जिल्हा कोअर कमिटी आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न |
साताऱ्यासह पश्चिम भागात पाऊस |
आरक्षण मिळेल, पण अगोदर नोकर्या वाचवा! |
कोंडवे येथील एका शाळकरी मुलाची आत्महत्या |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
एमडीआरटी सल्लागारांच्या क्रमवारीत टाटा एआयए जगात पाचव्या तर भारतात पहिल्या स्थानी |
महालक्ष्मीच्या आरतीसाठी सोळा दिवे आणि 56 भोग |
बेडग ते मंत्रालय लॉंग मार्च आंदोलकांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी साताऱ्यात मान्यवरांची भेट |
व्यवहारातील संवेदना समजावणारे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळायला हवे |
बेडग येथील कमान प्रकरणाचा रिपाईद्वारे साखळी मोर्चा काढून निषेध |