06:20pm | Apr 09, 2020 |
सातारा : कोरोनामुळे सातारा जिल्ह्यात करण्यात आलेल्या लॉक डाऊनचा काही प्रमाणात तोटा झाला असल्याची ओरड होत असतानाच त्याचा चांगला इफेक्टही झाला असल्याच्या घटनाही घडू लागल्या आहेत. महिला नदीवर धुणे धुण्यास तर नागरिक जनावरे, वाहने धुण्यास, निर्माल्य टाकण्यास येण्यासाठी धजावत नसल्यामुळे ५० वर्षानंतर जिल्ह्यातील सर्वच नद्या प्रथमच प्रदूषण मुक्त झाल्या असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना प्रथमच प्रदूषणमुक्त पाणी पिण्याचा अनुभव मिळत आहे.
सातारा जिल्ह्यातील एकूण नद्यांपैकी कृष्णा, कोयना, वेण्णा, वसना, उरमोडी, माणगंगा या प्रमुख नद्या मानल्या जातात. यापैकी कृष्णा, कोयना, वेण्णा यासह अन्य दोन अशा पाच नद्यांचा उगम महाबळेश्वर येथे झाला आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने कृष्णा नदी ही सर्वात मोठी नदी समजली जाते. महाबळेश्वर, वाई, सातारा, कराड अशी प्रवाहित होऊन ही नदी पुढे जाते. वाई येथून ते कृष्णा नदी समुद्राला मिळेपर्यंत या नदीवर धुणे, जनावरे, दुचाकी चारचाकी वाहने धुणे, नदीमध्ये निर्माल्य टाकणे, गावचे सांडपाणी नदीमध्ये सोडणे असे प्रकार ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळे सातारा जिल्ह्यात कृष्णा नदीसह अन्य नद्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्या होत्या.
क्षेत्रमाहुली, ता. सातारा येथे कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम झाला आहे. त्यामुळे तेथून नदीपात्र मोठे होत पुढे जाते. सातारा शहरानजीक ही नदी असल्यामुळे या नदीवर क्षेत्रमाहुली, संगम माहुली या स्थानिक गावांसह उपनगरातील अनेक महिला धुणे धुण्यासाठी, निर्माल्य नदीत टाकण्यासाठी येत असतात. उन्हाळ्याच्या दिवसात तर कृष्णा नदीला सर्व्हिसिंग सेंटरचे स्वरूप येते. दिवसभर नागरिक जनावरे व वाहने धुण्यासाठी या ठिकाणी गर्दी करत असल्यामुळे या नदीला प्रदूषणाचा विळखा पडला होता. सातारा शहरातील निम्म्या भागाला कृष्णा नदीतच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. पाणी फिल्टर करून ते पुरवले जात असले तरी, सातारकर यांच्या नशिबी मात्र स्वच्छ पाणी पिण्याचा योग जुळून येत नव्हता. मात्र ५० पेक्षा अधिक वर्षांनी सातारकरांना आता स्वच्छ व प्रदूषणमुक्त पाणी पिण्यास मिळत आहे त्याला कारणही तसेच घडले आहे.
कोरोनाच्या भीतीमुळे सातारा जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून कोणीही घराबाहेर पडू नका अशा सक्त सूचना प्रशासनाने केल्या आहेत. एक-दोन घटनांमुळे सातारा जिल्ह्यातही ही कोरोना बाधित व्यक्ती असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नागरिक, महिला खबरदारीचा उपाय म्हणून घराबाहेर पडण्यास धजावत नसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील कृष्णेसह सर्वच नद्या महिला, नागरिक, जनावरे, वाहने यांच्याशिवाय ओस पडल्यामुळे सर्वच नद्या प्रदूषण मुक्त होण्यास मदत झाली आहे. गावातील सांडपाण्याचा अपवाद वगळता सातारा जिल्ह्यातील सर्वच नद्या पांढऱ्या, शुभ्र खळखळत्या पाण्याने प्रवाहित होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |