सातारा : येथील जुना मोटार स्टँड परिसरात सोरट अड्डा चालविणार्या भाजपाचा पदाधिकारी संदीप आनंद मेळाट (रा. दिव्यनगरी, सातारा) आणि कुमार सुरेश मोरे (रा. शनिवार पेठ, सातारा) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी दुपारी अटक केली. सोरट अड्डा चालविल्याप्रकरणी त्या दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जुना मोटार स्टँड परिसरात सोरट अड्डा सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना शुक्रवारी मिळाली होती. यानुसार कारवाईच्या सुचना त्यांनी पथकास दिल्या. पथक त्याठिकाणी गेले असता सोरट खेळण्यासाठी बरेच जण जमा झाल्याचे त्यांना दिसून आले. स्थागुशाच्या पथकाची चाहुल लागताच सोरट अड्डा चालविणाजया दोघांनी पळ काढला. पळणार्या दोघांना पाठलाग करत स्थागुशाच्या पथकाने पकडले. पकडलेल्यांनी स्वत:चे नाव संदीप आनंद मेळाट (वय 29, रा. दिव्यनगरी, सातारा) आणि कुमार सुरेश मोरे (वय 28, रा. शनिवार पेठ, सातारा) अशी सांगितली.
पकडलेल्या दोघांकडून पोलिसांनी सोरट खेळण्याचा तक्ता आणि 2 हजार 300 रुपयांची रोकड जप्त केली. पकडलेल्या दोघांना शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देत याची तक्रार कर्मचारी प्रवीण फडतरे यांनी नोंदवली. यानुसार त्या दोघांना अटक करण्यात आली.
सोरट अड्डा चालविणाजया मेळाट आणि भाजपाचा शहराध्यक्ष सुनील कोळेकर याने मध्यंतरीच्या काळात जुगार अड्यांमुळे सामाजिक स्वास्थ बिघडत असल्याची पत्रकबाजी केली होती. याच कारणावरुन मध्यंतरीच्या काळात कोळेकर आणि मेळाट या दोघांवर काहीजणांनी हल्ला चढवला होता. हा हल्ला चढविल्यानंतर भाजपाच्या जिल्हाभरातील पदाधिकार्यांनी याचा निषेध करत पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी केली होती. यानुसार करवाई झाली सुध्दा पण आता त्यातीलच मेळाट सोरट अड्डा चालविताना सापडल्याने त्याची अवैध धंदे बंद करण्याची मागणी करणारी पत्रकबाजी नेमकी कोणत्या कारणासाठी याबाबत शंका उपस्थित होवू लागली आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |