नवी मुंबई : राज्यातील 7 प्रादेशिक परिवहन कार्यालयात करण्यात आलेल्या तपासणीमध्ये नियमबाह्यपणे योग्यता प्रमाणपत्र जारी केल्याचे निष्पन्न झाल्याने 28 मोटर वाहन निरीक्षकांसह 9 सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांना आज गृहविभागाने निलंबित केले आहे. त्यामुळे आरटीओ विभागात खळबळ उडाली आहे. आरटीओ विभागातील ही पहिलीच निलंबनाची मोठी कारवाई आहे.
मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका क्रमांक 28/2013 दाखल करण्यात आली होती. त्यामध्ये वाहनांना देण्यात येणारी योग्यता प्रमाणपत्र नियमानुसार काटेकोरपणे तपासणी करण्याचे आदेश न्यायालयाने उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांना दिले होते. मात्र यवतमाळ, कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, पनवेल आणि ठाणे या कार्यालयांची तपासणी केली असता, वाहनांना योग्यता प्रमाणपत्र काटेकोरपणे तपासणी न करता देण्यात आल्याचे समोर आले. ही बाब गंभीर असून, केंद्रीय व महाराष्ट्र मोटारवाहन नियम 45(11) अन्वये योग्यता प्रमाणपत्र तपासूनच देणे बंधनकारक असतानाही, हा प्रकार घडल्याने गृह (परिवहन) विभागाने याप्रकरणाची दखल घेऊन आज शुक्रवारी 28 मोटर वाहन निरीक्षकांसह 9 सहाय्यक मोटारवाहन निरीक्षक अशा 37 अधिकार्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामध्ये औरंगाबादचे 4, पिंपरी-चिंचवड 2, पुणे 13, ठाणे 4, कल्याण 1, पेण 1, कोल्हापूर 1, अमरावती 1, सांगली 1, कराड 2, बुलढाणा 1, यवतमाळ 2, पनवेल 2 येथील अधिकार्यांचा समावेश आहे.
परिवहन विभागातील योग्यता प्रमाणपत्राबाबत गृह विभागाने 37 आरटीओ अधिकार्यांना निलंबित केले. त्यामध्ये पेण आरटीओ कार्यालयातील अनिस अहमद सरदार बागवान, कल्याणचे ललित देसले, ठाण्याचे सुनिल म्हेत्रे, सुरेश आवाड, समीर शिरोडकर या मोटार वाहन निरीक्षकांचा समावेश आहे. तर, पनवेलचे प्रदीप ननवरे, रमेश पाटील आणि ठाण्यातील रविंद्र राठोड या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांचा निलंबनात समावेश आहे. परिवहन विभागातील योग्यता प्रमाणपत्राबाबत गृह विभागाने 37 आरटीओ अधिकार्यांना निलंबित केले. त्यामध्ये पेण आरटीओ कार्यालयातील अनिस अहमद सरदार बागवान, कल्याणचे ललित देसले, ठाण्याचे सुनिल म्हेत्रे, सुरेश आवाड, समीर शिरोडकर या मोटार वाहन निरीक्षकांचा समावेश आहे. तर, पनवेलचे प्रदीप ननवरे, रमेश पाटील आणि ठाण्यातील रविंद्र राठोड या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांचा निलंबनात समावेश आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |