01:48am | Apr 22, 2019 |
सातारा : जिल्ह्यात मंगळवारी 23 एप्रिल रोजी होणाऱ्या सतराव्या लोकसभेच्या जागांसाठी मतदान होणार आहे. त्यानिमित्त गेले तीन आठवडे चालू असलेल्या प्रचाराची रणधुमाळी रविवारी सायंकाळी 5 वाजता संपुष्टात आली. सातारा लोकसभा मतदार संघ आणि माढा लोकसभा मतदार संघातील फलटण, माण व खटाव यांचे मिळून 25 लाख मतदार मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सज्ज आहेत.
राज्यातील निवडणुकांचा प्रचार आज सायंकाळी 5 वाजता संपुष्टात आला. आता उमेदवारांना केवळ घरोघरी जाऊन प्रचार करण्याची मुभा राहील. सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उध्दव ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांच्या झंझावाती सभा झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. भाजपने अकलूजमध्ये नरेंद्र मोदी बारामतीत अमित शहा व साताऱ्यात देवेंद्र फडणवीस यांच्या सभांचा धुरळा उडवत बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीला अल्टिमेटम दिला. तर राष्ट्रवादीने माढा व सातारा लोकसभा मतदारसंघात गेल्या वीस वर्षाची राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली आहे. लोकसभेच्या सातारा व माढा दोन्ही जागांसाठी चुरशीच्या लढती होतील, अशा राजकीय अटकळी आहेत. सर्वच म्हणजे सहा विधानसभा क्षेत्रांमध्ये खासदार निवडीसाठी होणारे मतदान हे चुरशीचे होणार असल्याची चिन्हे आहेत.
उत्तर पूर्व कोरेगाव वगळता वाई खंडाळा महाबळेश्वर हा विधानसभा मतदारसंघ सातारा जिल्ह्यात सर्वात मोठा आहे. येथे राष्ट्रवादीची रसद तोडण्याची जवाबदारी माजी आमदार मदन भोसले व पुरुषोत्तम जाधव यांच्यावर देण्यात आली आहे. जावली तालुक्यात महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील हे आपले माथाडी कार्ड चालवणार यात शंका नाही. कराड व पाटण तालुक्यात महायुतीने ताकत पणाला लावत परिवर्तन घडवण्याचा चंग बांधला आहे होमग्राउंड सातारा जावली विधानसभा मतदारसंघात एकूण 3 लाख 25720 मतदार आहेत. जे 21 टक्के मतदार आहेत तर सहा विधानसभा मतदारसंघात मतदारांची संख्या सातारा लोकसभा मतदार संघ आणि माढा लोकसभा मतदार संघातील फलटण, माण व खटाव यांचे मिळून 25 लाख आहे. मतदारांचे हे प्रमाण 52.23 टक्के एवढे आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी नऊ उमेदवार असले तरीही खरी लढत ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशीच होणार आहे. काँग्रेस येथे औषधाला थोडीफार उरली असली तरी राजकीय करिष्मा घडवणारे नेतृत्वच नसल्याने काँग्रेस जिल्ह्यात पोरकी झाली आहे. माढयात भाजप उमेदवार रणजितसिंह निंबाळकर व राष्ट्रवादीचे संजयमामा शिंदे यांच्यात तुल्यबळ लढत होणार आहे. साताऱ्यात 2009, 2014 नंतर उदयनराजे भोसले हॅटट्रिक करण्याच्या तयारीत आहे. महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचा प्रवास राष्ट्रवादी भाजप शिवसेना असा झाला आहे. राष्ट्रवादीकडून ते विधान परिषदेचे आमदार होते. भाजप ने त्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्षपद त्यांना दिले. मात्र जागावाटपात सातारा सेनेच्या वाटयाला गेल्याने राजकीय समन्वयातून पाटलांनी शिवबंधन स्वीकारत खासदारकीचे तिकीट मिळवले. त्यामुळे सातारा व माढा या दोन मतदार संघाच्या लढती पश्चिम महाराष्ट्रात हाय होल्टेज लढती होत आहेत. मंगळवारी मतपेटया घेऊन मतदान केंद्र अधिकारी आपापल्या केंद्रावर जाणार आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात. पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, व पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सर्व सुरक्षा यंत्रणांचा आढावा घेतला. जिल्हयात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. शाहू स्टेडियममध्ये बंदोबस्तासंबंधी व निवडणूक कामाचेपोलिस व कर्मचाऱ्यांनाखास प्रशिक्षण देण्यात आले.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |