02:38am | Jul 20, 2019 |
कराड : सातारा जिल्ह्यातील हजारो शेतकर्यांनी मागील वर्षिच्या गळीत हंगामात कडेगाव तालुक्यातील केन अग्रो या साखर कारखान्याला आपला ऊस गाळपासाठी दिला आहे. केन अग्रो ला ऊस देवून पाच ते सहा महीने झाले तरी बर्याच शेतकर्यांना या साखर कारखान्याने एफ आर पी प्रमाणे होणारी ऊस बिलाची रक्कम अद्याप दिली नाही। वारंवार हेलपाटे घालुनही ऊस बिल मिळत नसल्याने कराड तालुक्यातील सुर्ली, कामथी, शामगाव, वाघेरी तसेच सातारा खटाव तालुक्यातील पारगाव, पुसेसावळी, म्हासुर्ने,लिंब व इतर गावातील लोकांनी एकत्र येवून काल स्वाभिमानी चे जिल्ह्याध्यक्ष सचिन नलवड़े यांच्या नेतृत्वाखाली केन अग्रो कारखान्यावार धड़क दिली परंतु येथील कर्मचार्यांना पगार न मिळाल्याने वॉचमन सोडून तिथे कुणीही हजर न्हवते त्यामुळे सर्व शेतकर्यांना घेवून स्वाभिमानी चे पदाधिकारी कडेगाव पोलीस स्टेशन गेले.
यावेळी सचिन नलवड़े यांनी पोलिसांना कारखान्याच्या चेरमन,संचालक मंडळ वर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. परंतु फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी असमर्थता दाखवली. यावेळी शेतकर्यांनी जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही असे स्पष्ट करुण तिथेच ठिय्या मारल. यावेळी पोलिसांनी तुम्ही फसवणुकी संदर्भात निवेदन दया आम्ही कायद्या प्रमाणे पुढील कारवाई करतो असे सांगितले. यावेळी लगेचच जिल्ह्याध्यक्ष सचिन नलवड़े यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड़ यांना फोन करुण सदर घटनेची माहिती दिली केन अग्रो ने शेतकर्यांना एफआरपीची रक्कम पाच महिने होवून ही दिली नाही तरी कारखान्यावर कायदेशीर कारवाई का झाली नाही असा प्रश्न केला त्यावेळी साखर आयुक्त यांनी तहसीलदार कडेगाव यांना सदर कारखान्याची साखर व इतर माल जप्तीचे आदेश दिले असल्याचे सांगितले.
तरीही केन अग्रो कारखान्यावर कारवाई झाली नसल्याने सचिन नलवड़े यांच्यासह शेतकर्यांनी तहसील कार्यालय गाठुन कडेगाव तहसीलदार यांना येत्या रविवार पर्यंत शेतकर्यांना पैसे मिळाले नाहीतर सोमवारी केन अग्रो चेरमनच्या घरासमोर व कडेपुर येथे ठिय्या व रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे निवेदन देवून या आन्दोलनाची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहिल असे सांगितले तसेच साखर आयुक्तांनी आदेश देवूनही कारखान्यावर कायदेशीर जप्तीची कारवाई का होत नाही असा प्रश्न करुण आपण आयुक्तांशी बोलावे असे सांगितले.
यावेळी तहसीलदार कडेगाव यांनी साखर आयुक्त यांना फोन वरुण आजच जप्तीचे आदेश काढत असल्याचे सांगितले यावेळी आक्रमक झालेल्या शेतकर्यांनी रविवार पर्यंत आम्हाला ऊस बिल दिले नाही तर आम्ही सोमवारी कडेपुर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणार असल्याचे ठामपने सांगितले. यावेळी स्वाभिमानी चे जिल्ह्याध्यक्ष सचिन नलवड़े, तालुकाध्यक्ष शिवाजी पाटिल, बापूराव पोळ, सुर्ली तटामुक्ति अध्यक्ष भिमराव ढमाले, बाजीराव पाटिल, शिवाजी सोनमळू, समीर पटेल, कृष्णत महाडिक व शेतकरी उपस्थित होते.
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |